Tokyo Olympic, Mary Kom : मेरी कोमनं पराभवही मोठ्या मनानं स्वीकारला, निकालानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:29 PM2021-07-29T16:29:50+5:302021-07-29T16:30:31+5:30

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला

Tokyo Olympic : Quite sporting of Mary Kom to welcome the decision with a smile and hugging her opponent, see pics | Tokyo Olympic, Mary Kom : मेरी कोमनं पराभवही मोठ्या मनानं स्वीकारला, निकालानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक!

Tokyo Olympic, Mary Kom : मेरी कोमनं पराभवही मोठ्या मनानं स्वीकारला, निकालानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक!

Next

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इंग्रीट लोरेना व्हेलेंसिया व्हिक्टोरियाला कडवी टक्कर देऊनही मेरीला हा पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे दुःख बाजूला ठेऊन ३८ वर्षीय मेरीन खिलाडूवृत्ती दाखवली आणि निकालानंतरच्या तिच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक होत आहे.  


महिलांच्या ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीसमोर कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरियाचे आव्हान होते. पहिल्या फेरीत इंग्रीटनं आक्रमक खेळ करताना ४-१ अशी बाजी मारली. मेरीनं डिफेन्सिव्ह खेळावरच भर दिला. दुसऱ्या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. जबरदस्त पदलालीत्य अन् जोरदार ठोसे मारून मेरीनं प्रतिस्पर्धीला बॅकफूटवर पाठवले. मेरीनं या फेरीत ३-२ अशी बाजी मारली. तिसऱ्या फेरीत कडवी टक्कर झाली. पण कोलंबियाची खेळाडू दमलेली पाहायला मिळाली. मेरीच्या आक्रमकतेसमोर तिला तग धरणे अवघड झाले. मेरीनं तिसऱ्या फेरीत ३-२ अशी बाजी मारली, परंतु सर्वाधिक गुणांच्या शर्यतीत कोलंबियाची खेळाडू वरचढ ठरली अन् तिला ३-२ असे विजयी घोषित केले गेले. Web Title: Tokyo Olympic : Quite sporting of Mary Kom to welcome the decision with a smile and hugging her opponent, see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app