मेस्सीच्या खोलीमध्ये चोरी; तीस लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 09:58 IST2021-10-02T09:57:28+5:302021-10-02T09:58:11+5:30

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हॉटेलमधील ज्या खोलीत राहतो त्याचे छत तोडून चोरांनी खोलीत प्रवेश केला.

Theft in Messis room looted Rs 30 lakh pdc | मेस्सीच्या खोलीमध्ये चोरी; तीस लाखांचा ऐवज लंपास

मेस्सीच्या खोलीमध्ये चोरी; तीस लाखांचा ऐवज लंपास

ठळक मुद्देअर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हॉटेलमधील ज्या खोलीत राहतो त्याचे छत तोडून चोरांनी खोलीत प्रवेश केला.

बार्सिलोना : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हॉटेलमधील ज्या खोलीत राहतो त्याचे छत तोडून चोरांनी खोलीत प्रवेश केला. चोरांनी जवळपास ३० लाख रुपयांचे सोने आणि रोकड चोरी केली. हॉटेलमध्ये मेस्सीने चार खोल्या घेतल्या होता. या चार खोल्यांचे दिवसाचे भाडे तब्बल १७ लाख रुपये आहे. चोरी झाली तेव्हा मेस्सी पीएसजीसाठी फुटबॉल सामना खेळत होता. त्यावेळी मेस्सीची पत्नी आणि तीन मुले देखील त्याच्यासोबत पॅरिस येथे होते. खोलीमध्ये कोणीच नसताना चोरांनी डाव साधला.

माहितीनुसार, खोलीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बालकनीचा दरवाजा खुला होता. या दरवाजातून चोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मेस्सीच्या खोलीत चोरी केलेल्या दागिन्यांची किंमत २९.६४ लाख रुपये आहे. शिवाय काही लाख रुपयांची रोकड चोरांनी नेली. काही दिवसांपूर्वी मेस्सी बार्सिलोना क्लब सोडून पीएसजी क्लबमध्ये गेला होता. अद्याप तो स्वत:च्या घरीदेखील गेलेला नाही.

हॉटेलने चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मॅनचेस्टर सिटीविरुद्ध मिळविलेल्या विजयानंतर मेस्सी हॉटेलमध्ये परत येताच क्रॅश बॅरिअर लावण्यात आले होते.

Web Title: Theft in Messis room looted Rs 30 lakh pdc