शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाला जखमांनी ग्रासले : वेंगसरकर

By admin | Updated: February 7, 2015 01:38 IST

जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : टीम इंडियाने विश्वचषकासाठी संघ निवडताना अनेक जखमी खेळाडूंना स्थान दिले. यामुळे जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.विशेष मुलाखतीत वेंगसरकर म्हणाले,‘‘खेळाडू फिट होतील या आशेपोटी संघात जखमी खेळाडूंचा भरणा करणे अंगलट येऊ शकते.’’ गेल्या विश्वचषकात ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’ बनलेला युवराजसिंग आणि फॉर्ममध्ये असलेला सलामीचा फलंदाज मुरलीविजय याला बाहेर ठेवण्याचा निर्णय ‘आश्चर्यकारक’ असल्याचे वेंगसरकरचे मत आहे. पाकविरुद्ध भारताला पहिलाच सामना खेळायचा आहे. वेंगसरकर यांच्या मते हा सामना भारताला संधीसारखा असेल. यात विजय मिळवून संघाचे मनोबल उंचावू शकतो, असे ते म्हणाले.या मुलाखतीचे मुख्य अंश असे...प्रश्न : आॅस्ट्रेलियातील दारुण पराभवाचा परिणाम विश्वचषकात होईल?वेंगसरकर : असे व्हायला नको. विश्वचषक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे. भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड शून्य आहे, शिवाय त्यांचा संघ दुबळा आहे. संघाचे संयोजन फिट असेल तर पाकला नमवून विजयी वाटचाल करू शकतो.प्रश्न : काही जखमी खेळाडूंचा भरणा असल्याने संघाच्या संयोजनावर समाधानी आहात का?वेंगसरकर : संघाकडे पर्याय नसल्याने जखमी खेळाडूंना ठेवावे लागत आहे. खेळाडू फिट होतील या आशेवर राहू नका. त्यापेक्षा यशासाठी उत्साही असलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना स्थान द्यावे. ईशांत फिट नसेल तर धवल कुलकर्णीला संधी द्या.प्रश्न : युवराजसिंगला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळायला हवे होते?वेंगसरकर : युवराजला संधी नाकारणे आश्चर्यचकित करणारे आहे. स्थानिक सामन्यात शानदार खेळत असून, ‘मॅचविनर’ आहे. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही कामात येतो. याशिवाय मुरली विजयला स्थान नाकारणे अधिक निराशाजनक आहे.प्रश्न : आॅस्ट्रेलियात गोलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. गडी बाद करणारे आणि धावा रोखणारे गोलंदाज नाहीत, यावर काय मत आहे?वेंगसरकर : आमच्याकडे दुर्दैवाने असे गोलंदाज नाहीत. गेल्या काही वर्षांत आम्ही दूरदृष्टी दाखविलेली नाही. खेळाच्या सर्व प्रकारात त्याच त्या गोलंदाजांच्या सेवा घेऊन त्यांचा फॉर्म खराब केला. आता महत्त्वाच्या स्पर्धेत हे गोलंदाज फिटनेस आणि फॉर्मशी झुंज देत आहेत.प्रश्न : भारताशिवाय विश्वचषकाचे प्रबळ दावेदार कोण?वेंगसरकर : आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांना भक्कम संधी असेल.(वृत्तसंस्था)