शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संघात पुनरागमनाचा विश्वास होता

By admin | Updated: October 21, 2015 01:37 IST

‘संघातून बाहेर फेकल्यानंतर काही काळ मी क्रिकेटपासून दूर होतो. मित्र व इतर कामांमध्ये गुंतून राहिलो होतो. मात्र, माझ्याकडे अजून वेळ असून, मी स्वत:ला सिद्ध करू शकतो, ही जाणीव

नवी दिल्ली : ‘संघातून बाहेर फेकल्यानंतर काही काळ मी क्रिकेटपासून दूर होतो. मित्र व इतर कामांमध्ये गुंतून राहिलो होतो. मात्र, माझ्याकडे अजून वेळ असून, मी स्वत:ला सिद्ध करू शकतो, ही जाणीव होती. सरावासाठी मी अगदी जिल्हा सामन्यातदेखील खेळत होतो. त्यामुळे भारतीय संघात पुनरागमनाची आशा होती. त्यानुसार अधिक चांगला खेळ करून मिळालेल्या संधीचे सोने करेन,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने दिली. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी जडेजाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जडेजाने रणजी सामन्यात सौराष्ट्र संघासाठी २४ गडी बाद केले असून, ९१ व ५८ धावांची दमदार खेळी करीत निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले. जून महिन्यात बांगलादेश संघाबरोबर त्याने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. या विषयी बोलताना जडेजा म्हणाला, ‘भारतीय संघात माझी निवड होणे हे काही माझ्या हातात नाही. मी सातत्याने आपला खेळ सुधारण्यासाठी प्रयत्न करीत होतो. रणजी स्पर्धेत त्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे निवड समिती माझ्या नावाचा नक्कीच विचार करेल, याचा विश्वास होता. खरे तर रणजी सत्राची सुरुवात होण्यापूर्वी काही महिने मी मैदानाकडे फिरकलोसुद्धा नव्हतो. मित्र आणि फार्म हाऊसमध्ये माझा वेळ जात होता.’ ‘रणजी सत्र सुरू होण्यापूर्वी महिनाभर मी सरावावर लक्ष केंद्रित केले. मला माझ्य ताकदीवरच संघात स्थान मिळवायचे आहे, अशी जाणीव होती. त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धेतही खेळलो. त्याचा फायदा झाला,’ असे जडेजाने सांगितले. (वृत्तसंस्था)