टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंचा 'TATA' कडून Altroz देऊन सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:10 IST2021-08-27T17:09:56+5:302021-08-27T17:10:38+5:30
TATA Motors नं देशाचं प्रतिनिधीत्व करत ब्रॉन्झ मेडलपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंचा केला सन्मान.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंचा 'TATA' कडून Altroz देऊन सन्मान
ज्यानं विजय मिळवला त्याचं कौतुक तर सर्वांकडूनच होत असतं. परंतु जे विजयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करतात परंतु अवघ्या काही अंतरावर त्यांचा विजय हुकतो अशांचाही सन्मान होणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics) भारताचं प्रतिनिधित्व करत ब्रॉन्झ मेडलपर्यंत पोहोचवणाऱ्या खेळाडूंचा TATA Motors नं अनोख्या पद्धतीनं सन्मान केला आहे. कंपनीनं कमी अंतरावर पदक हुकलेल्या २४ खेळाडूंचा आपल्या कंपनीची TATA Altroz ही कार गिफ्ट करून सन्मान केला.
कंपनीनं शुक्रवारी त्या खेळाडूंच्या हाती गाडीच्या चाव्या सोपवल्या. जरी त्या खेळाडूंनी मेडल पटकावलं नसलं तरी त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. या खेळाडूंना शुभेच्छा देत टाटा मोटर्सनं निरनिराळ्या खेळांच्या प्रकारातील म्हणजे हॉकी, कुस्ती, गोल्फ, बॉक्सिंग, डिस्कस थ्रो मधील २४ खेळाडूंना सन्मानित केलं. प्रत्येकानं गोल्ड मेडलसारखेच प्रयत्न केल्यानं त्यांना कंपनीकडून हाय स्ट्रीट गोल्ड कलर असलेली कार भेट म्हणून देण्यात आली. तसंच प्रत्येक कारवर त्यांचं नावही लिहिण्यात आलं आहे.
"नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ज्या प्रकारे जबरदस्त कामगिरी केली आहे, त्यांच्या आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या उत्तम खेळासोबतच त्यांच्या मेहनतीला ओळख देत टाटा अल्ट्रोज, गोल्ड स्टँडर्ड इन प्रीमिअम हॅचबॅक भेट म्हणून देताना आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया टाटा मोटर्सचे प्रवासी वाहतूक व्यवसाय विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी दिली.