Good News : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंना मिळणार Tata Altroz!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:17 PM2021-08-13T15:17:57+5:302021-08-13T15:18:49+5:30

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली.

The Tata Altroz for the athletes who missed the medal at Tokyo Olympics 2020 will come finished in  Tokyo Olympics  | Good News : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंना मिळणार Tata Altroz!

Good News : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंना मिळणार Tata Altroz!

Next

 
Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्य, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरूष हॉकी संघ यांनी कांस्यपदकाची कमाई केली. पण, यांच्याव्यतिरिक्त महिला हॉकी संघ, गोल्फपटू अदिती अशोक, कुस्तीपटू दीपक पूनिया यांना पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली.

भारताला पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधींच्या बक्षीसांचा पाऊस पडत आहे, नोकरीत बढती मिळत आहे. सेलिब्रेटिंकडून कौतुक होत आहे. पण, ज्या खेळाडूंनी पदक नाही पटकावले, परंतु त्यांच्या कामगिरीची साऱ्या जगानं दखल घेतली अशा भारतीय खेळाडूंना आता Tata Altroz ही आलीशान गाडी गिफ्ट म्हणून मिळणार आहे. टाटा मोटर्सनं तशी घोषणा केली आहे. या खेळाडूंमध्ये गोल्फटपू अदिती, कुस्तीपटू दीपक आणि महिला हॉकी संघाचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चौथे स्थान पटकावताना ऑलिम्पिकमधील १९८०नंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. 
'

'या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना कडवी टक्कर दिली आणि त्यांच्या जिगरबाज खेळीनं देशातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. आपले काही खेळाडू पोडियमच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्यांना पदकानं हुलकावणी दिली असली तरी त्यांच्या खेळानं लाखो भारतीयांची मनं जिंकली आणि उदयोन्मुख खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला,''असे टाटा मोटर्सच्या पँसेंजर व्हेडिकल बिजनसचे अध्यक्ष शैलेंद्र चंद्रा यांनी सांगितले.   

Web Title: The Tata Altroz for the athletes who missed the medal at Tokyo Olympics 2020 will come finished in  Tokyo Olympics 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.