शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सने उडवला स्वित्झर्लंडचा ५-२ ने धूव्वा

By admin | Updated: June 21, 2014 13:13 IST

फिफा विश्वचषकात फ्रान्सने स्वित्झर्लंडवर ५-२ असा दणदणीत मात करत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवण्याच्या दिशेने आगेकूच केले.

 
ऑनलाइन टीम
साल्वाडोर, दि. २१- फिफा विश्वचषकात फ्रान्सने स्वित्झर्लंडवर ५-२  असा दणदणीत मात करत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवण्याच्या दिशेने आगेकूच केले. आता स्वित्झर्लंडला अंतिम १६ मध्ये स्थान पटकवण्यासाठी होंडुरास विरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. 
फिफा विश्वचषकातील ग्रुप ईमध्ये शुक्रवारी फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड सामना पार पडला. सामन्याच्या १६ मिनीटालाच फ्रान्सच्या ओलिव्हर गेराउडने हेडरने गोल मारुन संघाचे खाते उघडले. यानंतर अवघ्या ६६ सेकंदांनी ब्लेस मॅट्यूएडीने फ्रान्ससाठी दुसरा गोल केला. विंगर मॅथ्यू व्हॅलबुएनाने ४०व्या मिनिटाला तिसरा गोल केला. 
पहिल्या सत्रात पेनल्टीवर गोल मारण्यात अपयशी ठरलेल्या बेन्झेमाने ६७ व्या मिनीटाला संघासाठी चौथा गोल गेला. ७३ व्या मिनीटाला सिसकोने पाचवा गोल मारला. फ्रान्सने ५-० अशी आघाडी घेतल्यावर स्वित्झर्लंडच्या ब्लेरिम जेमेली आणि ग्रॅनीट खाका यांनी सामन्याच्या शेवटी दोन गोल डागले. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. स्वित्झर्लंडचा गोलकिपर डिएगो बेनागालियोने काही गोल रोखल्याने स्वित्झर्लंडचा दारुण पराभव टळला. 
दरम्यान, ग्रुप ईमध्ये शुक्रवारी  होंडुरास विरूध्द इक्वेडोर यांच्यात सामना झाला. यात  इक्वेडोर संघाने होंडूरासचा 2-1 असा पराभव केला.होंडूरासच्यावतीने ३१ व्या मिनीटाला कार्लो कॉस्टलीने पहिला गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर इक्वेडोरच्या एनर वेलेन्सीयाने ३४ व्या मिनीटाला गोल करुन संघाला होंडुरासच्या बरोबरीने आणले. सामना संपण्याच्या २५ मिनीटांपूर्वी वॉल्टर अयोव्हीने इक्वेडोरसाठी दुसरा गोल मारुन संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. ग्रुप ईमध्ये आता फ्रान्स सहा गुणांसह पहिल्या, इक्वेडोर दुस-या तर स्वित्झर्लंड तिस-या स्थानावर आहे.