महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 02:34 AM2020-02-06T02:34:18+5:302020-02-06T02:34:48+5:30

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी ...

Sweet end of women's hockey team's New Zealand tour; India won the match by 3-0 in the fifth match | महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय

महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय

Next

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी न्यूझीलंडला ३-० ने नमवून शेवट गोड केला.

नवनीत कौरने ४५ आणि ५८ व्या मिनिटाला, तर शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला गोल केले. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. नवनीतने ४५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. नवनीतने सामना संपायला दोन मिनिटे असताना पुन्हा एकदा हल्ला चढविला. त्यात तिला यश आले.

भारताने दौºयातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघावर ४-० असा विजय नोंदविला होता. त्यानंतरच्या सामन्यात न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाकडून मात्र १-२ तसेच ०-१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. मंगळवारी चौथ्या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर १-० ने विजय नोंदविला. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी मायदेशी परतणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sweet end of women's hockey team's New Zealand tour; India won the match by 3-0 in the fifth match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.