सुरूची सिंगचा ‘सुवर्ण नेम’! नेमबाजी विश्वचषकात साधली सुवर्ण हॅट्ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 06:41 IST2025-06-14T06:41:41+5:302025-06-14T06:41:56+5:30
Shooting World Cup: भारतीय नेमबाजीत अलिकडे ‘गोल्डन गर्ल’अशी ख्याती मिळविणारी सुरूची सिंग हिने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शुक्रवारी वर्चस्वपूर्ण कामगिरीसह महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले.

सुरूची सिंगचा ‘सुवर्ण नेम’! नेमबाजी विश्वचषकात साधली सुवर्ण हॅट्ट्रिक
म्युनिच - भारतीय नेमबाजीत अलिकडे ‘गोल्डन गर्ल’अशी ख्याती मिळविणारी सुरूची सिंग हिने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शुक्रवारी वर्चस्वपूर्ण कामगिरीसह महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले.
१९ वर्षांच्या सुरूचीचा हा केवळ तिसरा विश्वचषक आहे. त्यात तिने सुवर्ण पदकाच्या हॅट्ट्रिकसह आपल्या खात्यात चौथ्या सुवर्णाची नोंद केली. याआधी एप्रिलमध्ये सुरूचीने ब्युनस आयर्स आणि लीमा येथील विश्वचषकात सुवर्णमय कामगिरी केली आहे.
आज फायनलमध्ये तिने २४१.९ गुणांची नोंद केली. फ्रान्सची रौप्य विजेती कॅमिली जेडझेवस्की हिने २४१.७ गुणांची नोंद केली. चीनच्या खेळाडूला कांस्यवर समाधान मानावे लागले, त्याआधी पात्रता फेरीत सुरूचीने ५८८ गुणांची नोंद करीत दुसरे स्थान पटकविले होते. दोन ऑलिम्पिक पदकांची मानकरी मनू भाकर ही ५७४ गुणांसह २५ व्या स्थानावर राहिली. त्यानंतर समालोचनादरम्यान मनूने युवा सुरूचीच्या सुवर्णमय कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.