शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

खेळातही देश ‘सुपर पॉवर’ व्हावा : राजनाथसिंह

By admin | Updated: April 3, 2015 00:29 IST

भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.

बेंगळुरू : भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.येथील एका स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री म्हणाले, ‘‘२१व्या शतकाचा विकास भारताशी संलग्न आहे. वैश्विक स्तरावर स्वत:चा बलाढ्यपणा सिद्ध करायचा झाल्यास भारताने आर्थिक क्षेत्रासोबतच क्रीडाक्षेत्रातही सुपर पॉवर बनायला हवे. एक वेळ अशी होती, की भारताचे खेळाडू आॅलिम्पिक आणि विश्वस्पर्धेत भाग घेऊन पाचव्या-सहाव्या स्थानावर समाधान मानायचे; पण आता काळ बदलला आहे. भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये तब्बल सहा पदकांची कमाई केली.’’आमच्या खेळाडूंमध्ये कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता आहे, हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले. कौशल्याच्या बळावर कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आली असल्याचे सांगून त्यांनी पाच वेळची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम तसेच बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालचे उदाहरण दिले. या महिलांनी देशाचे नाव उंच केल्याने दृष्टिकोन बदलून खेळांना मदत करण्याची वेळ जवळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले. कधीकाळी अभ्यासात हुशार असणे आणि परीक्षेत प्रावीण्य पटकावून अधिकारी बनण्यास अग्रक्रम दिला जायचा; पण सध्या खेळात करिअर घडवून मोठी झेप घेण्यास अग्रक्रम दिला जातो. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असल्यामुळे क्रीडाक्षेत्राला आर्थिक सुबत्ता लाभत आहे. आधी पश्चिमी देश खेळात आर्थिकदृष्ट्या संपन्न होते; त्यामुळे मेडल घेण्यातही त्यांचा नंबर आधी होता. आता भारतीय खेळाडू पदकांच्या चढाओढीत पुढे दिसतात. केंद्र सरकारदेखील खेळांना अधिक प्रोत्साहन देत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कॉर्पोरेट क्षेत्रानेही सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून खेळांसाठी सहकार्याचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)