शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘सनरायझर्स’ चमकले !

By admin | Updated: April 28, 2015 01:54 IST

विजयी मार्गावर परतण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने फलंदाजीत संघर्ष केला असला तरी त्यांची टिच्चून गोलंदाजी हीच विजयाचे गमक ठरली.

‘पंजाब’वर २० धावांनी विजय : डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, साहाचा संघर्ष व्यर्थ दिल्ली : विजयी मार्गावर परतण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने फलंदाजीत संघर्ष केला असला तरी त्यांची टिच्चून गोलंदाजी हीच विजयाचे गमक ठरली. अवघ्या दीडशतकी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबची त्यांनी दमछाक केली. दिग्गज ‘फेल’ ठरल्यानंतर वृद्धिमान साहाने (४२) पंजाबला विजयाशी आशा दाखवली होता मात्र तो परतताच पंजाबचा ‘खेळ’ संपला. त्यांना २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्सचे दीशतकी आव्हान पंजाबसाठी सोपे वाटत होते. मात्र बोल्टचे ३ तर भुवनेश्वर कुमारच्या दोन धक्क्यांनी पंजाब हादरले. त्यांचे चार फलंदाज अवघ्या ५३ धावांवर परतले. यामध्ये व्होरा (५), मार्श (३), बेली (२२) आणि मुरली विजय (१२) या दिग्गजांचा समावेश होता. डेव्हिड मिलरने १४ चेंडूंत १५ धावा केल्या. त्याला करण शर्माने बोल्टकरवी झेलबाद केले. त्यानंतर वृद्धिमान साहाने खेळाची सूत्रे हातात घेतली. सुरुवातीला सावध खेळी करणाऱ्या वृद्धिमनने गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ३३ चेंडंूत २ चौकार आणि एका षटकारच्या मदतीने ४२ धावा केल्या. त्याच्या या खेळीने पंजाबला विजयाची आशा दाखवली होती. मात्र त्याचा हा मोठा अडथळा बोल्टने दूर केला. अक्षर पटेल (१७), रिषी धवन (४), अनूरित सिंग (०) हे झटपट बाद झाले. सनरायझर्सकडून बोल्टने ३, भुवनश्वर कुमारने २, प्रविण कुमार, करण शर्मा आणि हेनरिक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी, डेव्हिड वॉर्नरच्या (५८) अर्धशतकाच्या जोरावर सनरायर्झ हैदराबादने २० षटकांत ६ बाद १५० धावापर्यंत मजल मारली होती. स्पर्धेच्या २७ व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मिशेल जॉन्सनने ‘गब्बर’ला म्हणजे शिखर धवनला दुसऱ्याच षटकांत तंबूत पाठवले. त्यामुळे बेलीचा हा निर्णय यशस्वी ठरला. शिखर धवन केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर विहारी अनूरितच्या चेंडूवर व्होराकरवी ९ धावांवर बाद झाला. त्यावेळी सनरायझर्सने २ बाद ५६ अशा धावा केल्या होत्या. वॉर्नर-हेनरिक्स या जोडीने २० धावांची भागीदारी केली. मात्र मोक्याच्या क्षणी डेव्हिड वार्नरला अक्षर पटेलने चकवले. तो मिलरकरवी झेलबाद झाला. वार्नरने ४१ चेंडूूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. वार्नरने अवघ्या ३५ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. तो बाद झाल्यानंतर सनरायझर्सच्या धावगतीला ‘ब्रेक’ लागला. नमन ओझा (२८) आणि रवि बोपरा (०) हे दोघेही लवकर बाद झाले. सावध खेळी करणारा हेनरिक्स अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याने ३२ चेंडूंत ३० धावा केल्या. यामध्ये केवळ एका चौकाराचा समावेश होता. अखेरच्या क्षणी रेड्डीने ८ चेंडूंत २२ धावा फटकारल्या. संदिप शर्माच्या अखेरच्या षटकात त्याने सलग दोन षटकार ठोकले. आशिषने तळात आक्रमक फटकेबाजी केल्याने सनरायझर्सला दीडशतकी मजल मारता आली. (वृत्तसंस्था)सनरायझर्स हैदराबाद :डेव्हिड वॉर्नर झे. मिलर गो. पटेल ५८, शिखर धवन झे. विजय गो. जॉन्सन १, हनुमा विहारी झे. वोहरा गो. अनुरित सिंग ९, मोइजेस हेन्रिक्स त्रिफळा गो. संदीप शर्मा ३०, नमन ओझा झे. मिलर गो. पटेल २८, रवि बोपारा झे. सहा गो. जॉन्सन ०, आशिष रेड्डी नाबाद २२, कर्ण शर्मा नाबाद १. अवांतर १, एकूण २० षटकांत ६ बाद १५०. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-१-३५-१, जॉन्सन ४-०-३९-२, अनुरित सिंग ४-०-२७-१, मुरली विजय ३-०-१६-०, अक्षर पटेल ४-०-२५-२, ऋषी धवन १-०-७-०किंग्ज इलेव्हन पंजाब : मुरली विजय धावचित (विहारी/ओझा) १२, मनन व्होरा त्रिफळा बोल्ट ५, शॉन मार्श त्रिफळा गो. भुवनेश्वर कुमार१, जॉर्ज बेली झे. शर्मा, गो. हेन्रिक्स २२, डेव्डि मिलर झे. बोल्ट गो. शर्मा १५, वृद्धीमान सहा झे. प्रविणकुमार गो. बौल्ट ४२, अक्षर पटेल त्रिफळा बोल्ट १७, ऋषी धवन पायचित गो. भुवनेश्वरकुमार ४, मिशल जॉन्सन नाबाद ४, अनुरित सिंग झे. वॉर्नर गो. प्रविण कुमार ०, संदीप शर्मा नाबाद १. अवांतर ७, एकूण २० षटकांत १३०. गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ४-०-१९-३, भुवनेश्वरकुमार ४-०-२३-२, प्रविणकुमार ४-०-३४-१, कर्ण शर्मा ४-०-२२-१, हेन्रिक्स ४-०-३०-१