फिरकीपटू सुनिल नरेनची गोलंदाजी शैली बेकायदेशीर, ICC ने केले निलंबीत

By Admin | Updated: November 29, 2015 20:40 IST2015-11-29T20:35:29+5:302015-11-29T20:40:20+5:30

वेस्ट इंडिजचा आघाडीचा फिरकीपटू सुनिल नरेनची गोलंदाजी शैली बेकायदेशीर असल्याचे आज आयसीसी जाहीर केले आहे. तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Sunil Narine bowled style illegal, ICC suspends | फिरकीपटू सुनिल नरेनची गोलंदाजी शैली बेकायदेशीर, ICC ने केले निलंबीत

फिरकीपटू सुनिल नरेनची गोलंदाजी शैली बेकायदेशीर, ICC ने केले निलंबीत

ऑनलाइन लोकमत, 

दुबई, दि. २९ - वेस्ट इंडिजचा आघाडीचा फिरकीपटू सुनिल नरेनची गोलंदाजी शैली बेकायदेशीर असल्याचे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले आहे. तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
आयसीसीने सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर कारवाई करत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले आहे. नरेनवरील निलंबन हे राष्ट्रीय तसेच घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्येही असणार आहे. 
 
मात्र, वेस्ट इंडिज मंडळाकडून होणाऱ्या स्पर्धांमध्ये काही अटी मान्य केल्यास नरेन खेळू शकतो. गोलंदाजीच्या ६.१च्या नियमानुसार १५ डिग्रीपर्यंत हाताचा कोपरा फिरवण्याल्या सूट दिली जाते. पण नरेनच्या गोलंदाजीची समीक्षा केल्यानंतर तो नियमाचे उल्लंघन करतो, हे स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेत नोव्हेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नरेनच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता.

Web Title: Sunil Narine bowled style illegal, ICC suspends