बुडापेस्ट, हंगेरी : भारतीय पैलवान सुमित मलिकला शनिवारी विश्वकुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १२५ किलो फ्री स्टाईल गटात उपांत्य फेरीत चीनच्या झिवेई डिगकडून पराभव पत्करावा लागला. सुमितचे आता लक्ष कांस्यपदकासाठी असेल.राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या सुमित मलिकला चीनच्या झिवेई डिगकडून ०-५ गुणांनी हार मानावी लागली. तत्पूर्वी, उपांत्यफेरीत सुमितने उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या येरमुकाम्बेट याला ६-१ ने पराभूत केले. त्याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या ताइकी यामामोटोने ४-१ अशी मात दिली. गोगाने रेपचेज फेरीतून पदक मिळवण्याची संधी मिळते का,याकडे सर्वांचे लक्ष आहे. ७४ किलो गटात जितेंद्र उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. ८६ किलो गटात पवन कुमार पात्रता फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही.
सुमित उपांत्य फेरीत पराभूत; आता लक्ष कांस्यपदकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 02:18 IST