सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:08 AM2021-09-07T05:08:32+5:302021-09-07T05:09:01+5:30

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

Success in the Paralympics due to the support of the government and stakeholders! pdc | सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

सरकार, हितधारकांच्या पाठिंब्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये मिळाले यश !

Next
ठळक मुद्देकाही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

दीपा मलिक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण आणि आठ रौप्यासह भारताने अभूतपूर्व १९ पदके जिंकली. त्यामुळे माझ्या आनंदाला उधाण आले आहे. नऊ प्रकारात ५४ खेळाडू पाठविण्यात आले तेव्हापासूनच यंदा सर्वोत्तम कामगिरीची मला खात्री होती. १९६८ ला पॅरालिम्पिक सुरू झाल्यापासून २०१६ च्या रिओ आयोजनापर्यंत आमच्या खेळाडूंनी केवळ १२ पदके जिंकली होती. यंदा १९ पदके जिंकून १६२ देशांमध्ये भारत २४व्या स्थानी आला.
त्यातही अविस्मरणीय कामगिरीसह पदकांची कमाई केली. सुमित अंतिलने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्ण, अवनी लेखराने विश्व विक्रमाची बरोबरी करीत सुवर्ण, तर मनीष नरवालने पिस्तूल प्रकारात विक्रमी सुवर्ण पटकविले. निषाद कुमार आणि प्रवीण कुमार यांनी उंच उडीत आशियाई विक्रम प्रस्थापित केले.

काही पदके थोड्या फरकाने हुकली, पण नेमबाज स्वरूप उन्हाळकर, ॲथलिट संदीप चौधरी, सोमण राणा आणि नवदीप तसेच बॅडमिंटनपटू तरुण ढिल्लन सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल आणि अमित सरोहा (ॲथ्लेटिक्स) आणि राहुल जाखड (नेमबाजी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा स्वतः मार्ग दाखवतात, तेव्हा खेळाडूंचे काम सोपे होते. टोकियोकडे रवाना होण्याआधी मोदींनी दोन तास खेळाडूंशी संवाद साधला. पदक जिंकल्यानंतर प्रत्यक्ष बोलून पाठ थोपटली. सर्वोच्च नेतृत्वाकडून, असे प्रोत्साहन मिळणे खेळाडूच्या यशात मोठी भूमिका बजावते.
भारतीय खेळाडूंनी हा चमत्कार कसा केला, याबाबत मला वारंवार विचारणा झाली. मी म्हणेन,‘भारत सरकार, पॅरालिम्पिक समिती, पॅरा स्पोर्टसला समर्थन देणारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि निमशासकीय संघटना यांच्यातील झालेल्या बदलाचा आणि योग्य समन्वयाचा हा परिणाम आहे.’ पीसीआयमध्ये आम्ही खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून काम केले. 

२०१६च्या पॅरालिम्पिकची पदक विजेती म्हणून खेळाडूला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सकारात्मक निकाल येऊ शकतात हे मी अनुभवातून सिद्ध केले. रिओमध्ये चार पदके मिळाल्यापासून पॅरास्पोर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. दिव्यांग खेळाडू क्षमतेच्या बळावर काहीही करू शकतात, अनेकजण सशक्त व्यासपीठ म्हणून आमच्या खेळाकडे पाहू लागले. धोरणे अधिक सर्वसमावेशक झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पाठिंबा लाभला. खेळाडूंनी कशाचीही काळजी न करता तयारीवर लक्ष केंद्रित करावे याची खात्री पटली. कोरोनामुळे मर्यादा असताना सरकारने आमच्या तयारीसाठी कुठलीही कसर शिल्लक राखली नाही. भारतात आता पॅरालिम्पिकचे नवे पर्व सुरू झाले, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. टोकियो २०२० ही केवळ सुरुवात आहे.  

Web Title: Success in the Paralympics due to the support of the government and stakeholders! pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.