शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरीनेच मुंबई जिंकली;  रोहन गमरे ठरला मालिकावीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 3:13 PM

रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले.

मुंबई : चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईवर मात करणाऱया रत्नागिरीनेच मुंबई जिंकली. मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल, अशी आशा असताना रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच्या स्पर्धेवरही आपलेच शिक्कामोर्तब केले. वेगवान चढायांबरोबर पकडींचाही अप्रतिम खेळ करणारा रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला. त्याला पॅशन प्रो ही बाईक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ चढाईपटूचा पुरस्कार मुंबईच्या अजिंक्य कापरेला मिळाला तर रत्नागिरीचा शुभम शिंदे पकडवीराचा मानकरी ठरला.

 

प्रभादेवीच्या जर्नादन राणे क्रीडा नगरीत आज कबड्डीप्रेमींचा जनसागर उसळला होता. तब्बल तीन हजार कबड्डीशौकिनांची तुफान गर्दी मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होती तर स्पोर्टस्वाला आणि कबड्डी यूनिव्हर्स या यू ट्युब चॅनेलवरून तब्बल 41 हजार क्रीडाप्रेमींना अंतिम सामना पाहिला. अत्यंत काँटे की टक्कर असलेल्या अंतिम सामन्यात शेवटची सात मिनीटे शिलल्क असेपर्यंत सामना दोलायमान स्थितीत होता. गुणफलकात रत्नागिरी 29-26 असा आघाडीवर होता. तेव्हाच सामन्याला कलाटणी देणारी चढाई बदली खेळाडू म्हणून आत आलेल्या ओंकार कुंभारने केली. त्याने चढाईत मिळवलेले दोन गुण रत्नागिरीला स्फूर्तीदायक ठरले. त्यानंतर रत्नागिरीने अजिंक्य कापरेची पकड करून मुंबईवर लोण लादत 33-26 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि सामन्यावरही पकड मजबूत केली. त्यानंतर मुंबईच्या ओंकार जाधव, अजिंक्य कापरेने मुंबईला गुण मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण रत्नागिरीचे अभेद्य क्षेत्ररक्षण ते यशस्वीपणे भेदू शकले नाही. दुसरीकडे रत्नागिरीने वेळकाढू खेळ करीत आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

त्याअगोदर रोहन गमरेने सामन्याच्या पहिल्याच चढाईला पहिला गुण मिळवत रत्नागिरीला भन्नाट सुरूवात करून दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने मुंबईच्या अजिंक्य कापरेची पकड करून 2-0 अशी आघाडी घेतली.त्यानंतर मात्र मुंबईच्या जाधव, कापरेने एकापेक्षा एक चढाया करीत रत्नागिरीचे संरक्षण खिळखिळे केले. मुंबईचा गुणांचा वेग इतका भन्नाट होता की 9-9 अशा बरोबरीतला सामना 2 मिनीटात 15-9 असा केला. पण मुंबईला ही आघाडी पुढची पाच मिनीटेही कायम राखता आली नाही. आधी रोहन गमरेची 2 गुणांची चढाई आणि त्यानंतर अजिंक्य पवारने मिळविलेले 3 गुण रत्नागिरीला बरोबरीत आणण्यास पुरेसे ठरले. या वेगवान चढायांमुळे आघाडीवर असलेली मुंबई मध्यंतराला 17-19 अशी पिछाड़ीवर पडली. मध्यंतरानंतर दोन्ही संघात वारंवार चकमकी उडाल्या. मुंबईचा गुणफलक 20-21 असताना सुशांत साईलने एक कल्पक चढाई करत रत्नागिरीच्या चौघांना मध्यरेषेपर्यंत खेचत आणले होते, पण रेषेला स्पर्श करण्याआधीच त्याला रोखण्यात रत्नागिरीला यश लाभले. ही पकड खूप निर्णायक ठरली. त्यानंतर सामना संपायला सात मिनीटे असेपर्यंत उभय संघातला धरपकडींचा खेळ फार रंजक झाला.

 

 तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत रत्नागिरीने रायगडचा 32-24 असा सहज पराभव केला. रत्नागिरीच्या विजयात रोहन गमरे, अजिंक्य पवार आणि शुभम शिंदे हीरो ठरले. रायगडकडून स्मितील पाटील आणि गौरव पाटील चमकले. तसेच मुंबई शहरसमोर ठाण्याचे काहीही चालले नाही. सुशांत साईल, अजिंक्य कापरे यांनी अप्रतिम खेळ करीत ठाण्याची 50-23 अशी धूळधाण उडवली. महत्त्वाच्या लढतीत ठाण्याचा संघ अत्यंत दुबळा भासला. चार दिवस रंगलेल्या या दिमाखदार कबड्डी महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा माजी राज्यमंत्री सचिन अहिर, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, निशीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई