क्रीडा विराट जोड
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:44+5:302015-06-15T21:29:44+5:30
भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशाचा डाव ६६ षटकांत गुंडाळला. आश्विनने ५, तर हरभजनने ३ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत दहाव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली, तर स्टार ऑफ स्पिनर हरभजनने जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हरभजनने यापूर्वी आयपीएल टी-२०मध्ये सर्वांत वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे.

क्रीडा विराट जोड
भ रतीय गोलंदाजांनी बांगलादेशाचा डाव ६६ षटकांत गुंडाळला. आश्विनने ५, तर हरभजनने ३ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत दहाव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली, तर स्टार ऑफ स्पिनर हरभजनने जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हरभजनने यापूर्वी आयपीएल टी-२०मध्ये सर्वांत वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे.विराट म्हणाला, 'गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता असलेेले खेळाडू संघात असल्यामुळे आनंद झाला. आश्विन व हरभजन या दोन्ही खेळाडूंत सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. कर्णधार म्हणून या दोन्ही खेळाडूंना एकत्र गोलंदाजी करताना बघताना आनंद झाला.'धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपदी नियुक्ती झालेल्या विराटने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की प्रदीर्घ कालावधीपासून संघाचा सदस्य असलेल्या खेळाडूविना खेळताना चुकल्यासारखे वाटते. सचिन तेंडुलकर सर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली त्याही वेळी अशीच भावना होती. एकाच्या अनुपस्थितीमुळेही ड्रेसिंग रूमचा माहोल बदलतो. एक क्रिकेटर म्हणून नेहमी त्याचा सल्ला घेणे, त्याच्यासोबत चर्चा करणे, हे सगळे बदलून जाते. ज्या आवाजाची ड्रेसिंग रूमला सवय जडलेली असते, तो आवाज नसला म्हणजे वेगळेच भासते. (वृत्तसंस्था) ०००