क्रीडा : लक्ष्मण
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30
भारत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण

क्रीडा : लक्ष्मण
भ रत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण नवी दिल्ली : वर्ल्डकपमध्ये २२ फेब्रुवारी रोजी होणार्या भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजू वरचढ मानली जात असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही़व्ही़एस़ लक्ष्मण याने टीम इंडिया आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम आहे, असे म्हटले आहे़लक्ष्मण म्हणाला, की ऑस्ट्रेलिया दौर्यातील कसोटी आणि वन-डे मालिकेत भारताला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नव्हता; मात्र पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघात नवीन उत्साह संचारला आहे़ याच बळावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करील़गत अडीच महिन्यांपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे़ त्यामुळे येथील वातावरणाची टीम इंडियाला सवय झाली आहे, तसेच वेगवान आणि उसळी घेणार्या खेळप्यांवर खेळण्याची आता भारतीय फलंदाजांना सवय झाली आहे़ त्यामुळे भारतीय संघ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर यांचा सहज सामना करू शकतो, असेही लक्ष्मण याने सांगितले़ (वृत्तसंस्था)