नवी दिल्ली : दिल्लीच्या क्रीडा पत्रकार संघाने (डीएसजेए) वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे़ श्रीवास्तव यांचे येथे शनिवारी निधन झाले़ मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते़ ख्यातनाम पत्रकार श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल डीएसजेएचे अध्यक्ष चंद्रशेखर लुथरा आणि सचिव धर्मेंद्र पंत यांनी डीएसजेएकडून शोक व्यक्त केला़ श्रीवास्तव यांचे सहकारी रोशन सेठी तसेच त्यांच्यासोबत अनेक स्पर्धेत कव्हरेज करणारे राजेंद्र सजवान, दिल्लीतील क्रीडा पत्रकारांनी यांनी शोक व्यक्त केला.
क्रीडा पत्रकार विजय श्रीवास्तव यांचे निधन
By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST