शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

महाराष्ट्राच्या नेमबाजांवर शस्त्र उसनं घेण्याची वेळ; मुंबईतील विमानतळावर संतापजनक प्रकार

By स्वदेश घाणेकर | Published: January 09, 2020 4:51 PM

मुंबईच्या विमानतळावर संतापजनक प्रकार

-  स्वदेश घाणेकरखेलो इंडिया 2020 : गुवाहाटी येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे जवळपास 500 खेळाडू रवाना झाले. खेलो इंडिया 2020 युथ गेम्स महोत्सवातील जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या स्पर्धांना आजपासून झाला. महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या संघांसह टेबलटेनिस व नेमबाजपटू गुवाहाटीसाठी रवाना झाले. पण, मुंबईच्या विमानतळावर महाराष्ट्राच्या नेमबाजांना अत्यंत वाईट अनुभव आला. खेळाडूंना जवळपास साडेचार तास सुरक्षारक्षकांच्या चौकशीला सामोरे जावे लागले, त्यानंतरही दोन नेमबाजांच्या पदरी निराशा आली. मुंबईच्या विमानतळावर त्यांच्यासोबत संतापजनक प्रकार घडला. 

गुवाहाटी येथे आजपासून खेलो इंडिया 2020 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेमबाज गुरुवारी मुंबईच्या विमानतळावर दाखल झाले. महाराष्ट्राचे जवळपास 500 खेळाडू विविध विमानानं गुवाहाटी येथे दाखल होणार होते. नेमबाजांसह 36 जणांसाठी स्पाईस जेटच्या 6265 या विमानाचं तिकिट बुक करण्यात आलं होतं. नेमबाजांसोबत असलेल्या शस्त्रांच्या तपासासाठी विमानतळावर बराच वेळ जातो, हे माहित असल्यानं नेमबाजपटू व अधिकारी जवळपास साडेचार तास पूर्वीच मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.

खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणींचे जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष्य 

यावेळी विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी नेमबाजांकडील असलेले शस्त्र परवानं, क्रीडा मंत्रालयाचे पत्र आणि अन्य कागदपत्र तपासली. त्यानंतर कोणतंही कारण न देता सुरक्षारक्षकांनी महाराष्ट्राच्या दोन नेमबाजांना शस्त्र नेण्यास परवानगी नाकारली. क्रीडा मंत्री, अन्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून सुरक्षारक्षकांकडे विनंती करूनही त्यांनी शस्त्र नेण्यास परवानगी दिली नाही. यात शॉट गनसह रायफलचा समावेश आहे. या तपासात  चार तास वाया गेल्यामुळे दोन नेमबाजांना शस्त्रांशिवाय गुवाहाटी येथे जावे लागले. त्यामुळे आता त्यांना गुवाहटी येथे स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धींकडून शस्त्र उसनं घ्यावी लागणार आहेत, अशी माहिती नेमबाज प्रशिक्षक विश्वजीत शिंदे यांनी 'लोकमत'ला दिली. याबाबत सुरक्षारक्षकांकडे नियमाची प्रत दाखवण्याची विनंती केली असता, तिही त्यांनी धुडकावून लावली. 

महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांनीही स्पाईस जेटच्या या वागण्यावर तीव्र नाराजी प्रकट केली. त्यांनी याची तक्रार केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्राचे नेमबाजहर्षदा निथवे, राबिया अकबर काकटिकर, वरिधी गोराय, शुभांगी सुर्यवंशी, जान्हवी देशमुख, शर्वरी भोईर, समर्थ मंडलीक, सैराज काटे, नुपूर पाटील, शवरी पाखळे, मोहित गोवडा, रुद्रांक्ष विश्वंभर, शाहु माने, विराज पाटील, यशिका शिंदे, भक्ती खामकर, विराज रोकडे, हर्षवर्दन यादव, रामशा कितेकर, अभिषेक पाटील. 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाShootingगोळीबारMaharashtraमहाराष्ट्र