शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सलग दोन मालिका विजय विराटसाठी स्पेशल

By admin | Updated: November 27, 2015 23:54 IST

एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते.

एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावरील संघ असल्यामुळे विराटसाठी हा मालिका विजय मोठी उपलब्धी आहे. मला विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये बदल दिसत आहे. कर्णधार म्हणून विराट अ‍ॅक्टिव्ह आहे. तो प्रत्येक चेंडूनंतर खेळाडूंसोबत चर्चा करतो. कारण तो धोनीप्रमाणे यष्टिरक्षण करीत नाही. तो गोलंदाजांसोबत चर्चा करतो. त्यामुळे गोलंदाजांना कामगिरी सुधारण्यास मदत मिळते. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम अमलाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी-कधी दोन स्वरूपासाठी वेग-वेगळे कर्णधार असणे चांगली बाब ठरते, पण कधी-कधी अडचणीचेही ठरते. कारण त्यामुळे दुसरा कर्णधार थोडा रिलॅक्स होतो. तसे वेगवेगळ्या शैलीच्या कर्णधारांना परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ लागतो. या खेळपट्टीवर कर्णधार म्हणून एबी डिव्हिलियर्सलाही संघर्ष करावा लागला असते, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. हाशिमने चांगली भूमिका बजावली. निकालाच्या आधारावर त्याच्या कामगिरीचे आकलन करणे योग्य ठरणार नाही. आमला ही भूमिका बजावू शकतो किंवा नाही, याचा निर्णय पुढील सहा महिन्यांमध्ये होईलच. मी कधीच दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेलो नाही, पण अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली नक्कीच खेळलो. गेल्या तीन वर्षांत दक्षिण आफ्रिका कसोटी संघात अनेक बदल झालेले आहेत. कर्णधार ग्रॅमी स्मिथ, अष्टपैलू जॅक कॅलिस, शानदार यष्टिरक्षक मार्क बाऊचर आता संघात नाहीत. अशा खेळाडूंची उणीव भरून काढण्यासाठी कधी-कधी एका दशकाचाही वेळ लागू शकतो. या व्यतिरिक्त डेल स्टेनही संघात नाही. त्याची रिव्हर्स स्विंग गोलंदाजी या खेळपट्टीवर भेदक ठरली असती. मी खेळपट्टीबाबत काही बोलू इच्छित नाही. येथे खेळणे निश्चितच कठीण होते, पण द. आफ्रिका संघाने फिरकीविरुद्ध लौकिकाला साजेशी फलंदाजी केली नाही. भारताला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. अश्विनने सामन्यात १२ बळी घेतले. त्याचा मारा खेळणे अडचणीचे ठरत आहे. तो जगातील सर्वोत्मत आॅफ स्पिनर ठरत आहे. कामगिरीत सातत्य राखणारा अश्विन आक्रमकही आहे. जडेजाही चांगली गोलंदाजी करीत आहे. खेळपट्टी त्याच्यासाठी अनुकूल आहे. पहिल्या डावात ७९ धावांत गारद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघासाठी सामन्यात परतणे कठीण होते. (टीसीएम)