शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेचा भारतावर १८ धावांनी विजय

By admin | Updated: October 18, 2015 21:37 IST

चांगल्या सुरवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजाच्या हाराकीरीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द.आफ्रिकेने भारतावर १८ धावांनी विजय मिळवत गांधी - मंडेला मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.

ऑनलाइन लोकमतराजकोट, दि. १८ - चांगल्या सुरवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजाच्या हाराकीरीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द.आफ्रिकेने भारतावर १८ धावांनी विजय मिळवत गांधी - मंडेला मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. भारतातर्फे रोहित शर्मा(६५), विराट कोहली(७७), एम.एस धोनी(४७) यांचे पर्यत्न जिंकण्यासाठी अपुरे पडले. शिखर धवन(१३), सुरेश रैना(००), अजिंक्य रहाणे(०४) अपयशी ठरले. हरभजन सिंह (२०) अक्षर पटेल (१५) धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने अचुक मारा करत भारतीय फलंदाजांना रोखले, आफ्रिकेतर्फे मोर्ने मॉर्केलने ४ बळी मिळवले तर इम्रान ताहिरने आणि जीन पॉल ड्युमिनीने प्रतेकी एका फलंदाजाला बाद केले.त्यापुर्वी, क्विंटन डीकॉकचे दमदार शतक आणि फाफ डू प्लेसिसचे अर्धशतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावत २७० धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना लगाम लावला. राजकोट येथील तिस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड मिलर या सलामीच्या जोडीने आफ्रिकेला अर्धशतक गाठून दिले. मात्र हरभजनच्या फिरकीवर मिलरने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला व आफ्रिकेची सलामीची जोडी ७२ धावांवर फुटली. त्यापाठोपाठ अमित मिश्राने हाशिम आमलाला ५ धावांवर असताना यष्टिचित केले. मात्र यानंतर डीकॉकने प्लेसिसच्या साथीने आफ्रिकेचा डाव पुढे नेला. या जोडीने तिस-या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. आफ्रिका ३०० चा टप्पा गाठेल असे वाटत असतानाच प्लेसिस ६० धावांवर बाद झाला आणि ही जोडी फोडण्यात भारताला यश आले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखले. डिव्हिलियर्स ४, जे पी ड्यूमिनी १४ आणि डेल स्टेन १२ धावांवर बाद झाला. फरहान बेहरदीनने नाबाद ३३ धावांची खेळी करत आफ्रिकेला २७० धावांचा पल्ला गाठून दिला. भारतातर्फे मोहित शर्माने दोन, तर अमित मिश्रा, हरभजन सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.