शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

स्नेहल, रोहित यांनी जिंकले सुवर्ण; जळगावच्या भावंडांनी पिकलबॉल स्पर्धा गाजवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 17:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई : येथे सुरु असलेल्या अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत जळगावच्या भावंडांनी आपला दबदबा राखला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई : येथे सुरु असलेल्या अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत जळगावच्या भावंडांनी आपला दबदबा राखला आहे. स्नेहल पाटीलने १९ वर्षांखालील गटात आणि खुल्या गटात एकेरीचे सुवर्ण पदक पटकावल्यानंतर मुलांच्या १९ वर्षांखालील गटातही स्नेहलचा भाऊ रोहित पाटील याने सुवर्ण जिंकले.

अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने आणि प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या १९ वर्षांखालील एकेरी अंतिम सामन्यात रोहित पाटीलला जेतेपद पटकावण्यासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. अमोल रामचंदाने याने पहिला सेट जिंकून शानदार आघाडी घेतली. परंतु, यानंतर त्याला आपली आघाडी कायम राखण्यात यश आले नाही. रोहितने जबरदस्त पुनरागमन करताना ६-११, ११-९, १२-१० असा विजय मिळवत दिमाखात सुवर्ण पटकावले. 

त्याआधी, स्नेहल पाटीलने १९ वर्षांखालील आणि खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात बाजी मारताना दोन सुवर्णपदके पटकावली. ऐकांश चौहानने १६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात बाजी मारताना. १९ वर्षांखालील गटाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात स्नेहलने लक्षिता चितळेचे कडवे आव्हान १५-१३, असे परतावले. लक्षिताने प्रत्येक गुणासाठी स्नेहलला चांगली लढत दिली. मात्र, अखेरच्या क्षणी स्नेहलने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना सुवर्ण पटकावले. काव्या एन. हिने कांस्यपदक जिंकताना सौम्य लेलेला ११-३ असे नमवले.

यानंतर खुल्या गटातही जबरदस्त वर्चस्व राखताना स्नेहलने अंतिम सामन्यात प्रियांका मेहताचे आव्हान ११-२, ११-६, असे सहज परतावले. या लढतीत स्नेहलच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे प्रियांकाला फारशी संधी मिळाली नाही. कांस्यपदकाच्या लढतीत अनुजा महेश्वरीने अनपेक्षित विजय मिळवताना अनुभवी वृशाली ठाकरेचा १५-११, असा पराभव केला.

टॅग्स :MumbaiमुंबईJalgaonजळगाव