शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

शिवलकर , गोयल यांचे सी.के नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन

By admin | Updated: February 27, 2017 20:42 IST

आपल्या जबरदस्त फिरकीच्या जोरावर अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्य़ा पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांचे बीसीसीआयच्या

ऑनलाइन लोकमत
 मुंबई, दि. 27 - आपल्या जबरदस्त फिरकीच्या जोरावर अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्य़ा पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांचे बीसीसीआयच्या कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. बीसीसीआयने  ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेणाऱ्या शिवलकर आणि गोयल यांची एकेकाळी देशातील आघाडीच्या फिरकी गोलंदाजांमध्ये गणना होत असे, पण त्यांना एकाही कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. 
मुंबईच्या रणजी संघातून खेळणाऱ्या पद्माकर शिवलकर यांनी 124 प्रथमश्रेणी सामन्यात 589 बळी टिपले होते. 1972-73 च्या रणजी हंगामात तामिळनाडूविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत  त्यांनी  कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 16 धावांत 8 आणि 18 धावांत 5 बळी टिपले होते. मात्र त्यांनी मुंबईला अनेक रणजी विजेतेपदे जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर पतियाळा, दक्षिण पंजाब, दिल्ली आणि हरयाणा या संघांकडून खेळणाऱ्या  राजेंद्र गोयल यांनी 157 प्रथमश्रेणी सामन्यामधून 750 बळी टिपले होते. मात्र त्याकाळात सुभाष गुप्ते, बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर आणि इरापल्ली प्रसन्ना असे महान फिरकी गोलंदाज भारतीय संघात असल्याने  प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतरही त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही.