शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

शशांक मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 11:53 IST

नुकताच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - नुकताच बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहर यांची आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. 
आयसीसीचे चेअरमनपद भूषविण्यासाठी आपण बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, या वृत्ताचे शशांक मनोहर यांनी नुकतेच खंडन केले होते. मंगळवारी मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडताच आयसीसी चेअरमन बनण्यासाठीच मनोहर यांनी अध्यक्षपद सोडल्याचे बोलले जात होते. अखेर हे वृत्त खरे ठरले असून दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड झाली आहे. 
मनोहर यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. या महिन्यात आयसीसीला आपल्या नव्या चेअरमनची निवड करायची असताना मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आयसीसीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते, की चेअरमन स्वतंत्र राहणार असून तो आपल्या देशाच्या बोर्डात कुठल्याही पदावर राहणार नाही.
 
शशांक मनोहर यांनी केले होते खंडन
 
मीडियाच्या वृत्तानुसार मनोहर यांनी या वृत्ताचे खंडन केले होते. 'बीसीसीआय अध्यक्ष हे किती भक्कम पद आहे, याची जगाला जाणीव असल्याने आयसीसीमधील पदासाठी मी हे पद का सोडावे? असा सवाल विचारत मला वाटले तर मी बीसीसीआयप्रमुख आणि आयसीसी चेअरमन या पदावर कायम राहिलो असतो.' असे त्यांनी म्हटले.

मनोहर हे बीसीसीआय अध्यक्ष असताना आॅक्टोबरपासून आयसीसी चेअरमनपददेखील सांभाळत होते. बीसीसीआयने त्यांना चेअरमनपदावर नामनिर्देशित केले होते. जूनपर्यंत चेअरमनपदाचा त्यांचा कार्यकाळ  होता. मात्र बीसीसीआय अध्यक्षपद सोडताच त्यांना चेअरमनपददेखील सोडावे लागणार होते. बीसीसीआयप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर चेअरमनपदावर कायम राहणे बेकायदेशीर असल्याचे आपले मत असल्यामुळेच मी राजीनामा दिला, असे मनोहर यांनी सांगितले.