शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मालिका खिशात

By admin | Updated: November 9, 2014 23:07 IST

भारताने श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या

हैदराबाद : उमेश यादव (४ बळी) व अक्षर पटेल (३ बळी) यांच्या अचूक माऱ्यानंतर शिखर धवन (९१ धावा, ७९ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) व विराट कोहली (५३ धावा, ४ चौकार, १ षटकार) यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने रविवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या तिसऱ्या लढतीत श्रीलंकेचा ६ गडी व ३५ चेंडू राखून पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजय आघाडी घेतली.भारताने श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन व अजिंक्य रहाणे (३१ धावा, ५ चौकार) यांनी सलामीला ६२ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर धवनने अंबाती रायडूच्या (३५ धावा, ३ चौकार) दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करीत भारताच्या विजयाची मजबूत पायभरणी केली. रायडू धावबाद झाल्यानंतर धवनने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. शतकाकडे वाटचाल करणारा धवन चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. धवनविरुद्ध कुलसेकराच्या गोलंदाजीवर संगकाराने केलेले झेलबादचे अपील पंचानी उचलून धरले. रिल्पेमध्ये मात्र चेंडू हेल्मेटला चाटून गेल्याचे दिसत होते. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अनुभवी सुरेश रैनाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करीत विजय निश्चित केला. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाल्यानंतर रैनाने (नाबाद १८) वृद्धिमान साहाच्या (नाबाद ६) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, माहेला जयवर्धनेच्या (११८) शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४२ धावांची आव्हानात्मक मजल मारली.मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जयवर्धनेच्या शतकी खेळीनंतरही श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेची सुरुवातीला २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर जयवर्धने (११८) आणि तिलकरत्ने दिलशान (५३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०५ भागीदारी करीत डाव सावरला. जयवर्धनेने १२४ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ११८ धावांची खेळी केली. दिलशानने ८० चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांचे योगदान दिले. माहेलाने सीकुगे प्रसन्नासोबत आठव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेला दोनशेचा पल्ला ओलांडून दिला. सुरुवातीला सुदैवी ठरलेल्या प्रसन्नाने २ चौकार व १ षटकार लगाविला. माहेला जयवर्धनेचा महत्त्वाचा बळी अश्विनने घेतला. प्रसन्नाला यादवने तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (१०) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले तर अक्षर पटेलने ४० धावांत ३ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. यागदवने कुशल परेरा (४), कुमार संगकारा (०), थिसारा परेरा (१) आणि प्रसन्ना (२९) यांना बाद केले तर अक्षर पटेलने अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (१०), अशान प्रियंजन (२) आणि चतुरंगा डी सिल्वा (२) यांना माघारी परतवले. अंबाती रायडूने १६ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. त्याने दिलशानला बाद केले. (वृत्तसंस्था)