सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

By Admin | Updated: April 4, 2015 04:08 IST2015-04-04T04:08:56+5:302015-04-04T04:08:56+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सने सिमोना हालेपचा पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या

Serena Williams finals | सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

मियामी : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सने सिमोना हालेपचा पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष विभागात नोव्हाक जोकोव्हिच व जॉन इस्नर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवले.
सेरेनाने रुमानियाच्या सिमोना हालेपविरुद्ध ६-२, ४-६, ७-५ ने संघर्षपूर्ण विजय मिळवला. सेरेनाने मियामी ओपन स्पर्धेत दहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. पुरुष विभागात अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या डेव्हिड फेररचा तर दुसऱ्या लढतीत अमेरिकेच्या जॉन इस्नेरने जपानच्या केई निशिकोईचा पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. जोकोव्हिचने फेररचा ७-५, ७-५ ने तर इस्नेरने जपानच्या निशिकोईचा ६-४, ६-३ ने पराभव केला. २०१०मध्ये अ‍ॅण्डी रोडिकनंतर अमेरिकन खेळाडूला मियामी ओपनमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. इस्नरला या वेळी जेतेपदाची संधी आहे, पण त्यासाठी त्याला यानंतरचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. (वृत्तसंस्था)

Web Title: Serena Williams finals