सानिया-हिंगीसची विजयी घोडदौड खंडित

By Admin | Updated: February 27, 2016 03:58 IST2016-02-27T03:58:23+5:302016-02-27T03:58:23+5:30

भारताची टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांची सलग ४१ सामने जिंकण्याची विजयी घोडदौड कतार ओपनमध्ये खंडित झाली. जागतिक

Sania-Hingis's winning streak broke | सानिया-हिंगीसची विजयी घोडदौड खंडित

सानिया-हिंगीसची विजयी घोडदौड खंडित

दोहा : भारताची टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांची सलग ४१ सामने जिंकण्याची विजयी घोडदौड कतार ओपनमध्ये खंडित झाली. जागतिक क्रमवारीतील नंबर वन असणाऱ्या या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
सानिया आणि हिंगीस यांना गुुरुवारी रात्री झालेल्या लढतीत एलेना वेस्निना आणि दारिया कसात्किना या रशियन जोडीने २-६, ६-४, १0-५ असे पराभूत केले. महिला दुहेरीतील सलग तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या ‘सॅन्टिना’ला गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात सिनसिनाटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
येथे आधीच्या फेरीत चीनच्या अग्रमानांकित जोडीविरुद्ध तीन सेटमध्ये विजय नोंदवणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या नंबर वन जोडीला पहिला सेट जिंकून वर्चस्व राखल्यानंतरही विजय मिळवता आला नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Hingis's winning streak broke