शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

सायना, श्रीकांत सुसाट

By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST

स्पर्धेत तृतीय मानांकनप्राप्त सायनाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले

कोलून : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल व युवा खेळाडू के़ श्रीकांत यांनी हाँगकाँग बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये आपले विजयी अभियान कायम राखताना प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र, पी़ व्ही़ सिंधूला स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला़स्पर्धेत तृतीय मानांकनप्राप्त सायनाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि अमेरिकेच्या बीवेन झांग हिचा अवघ्या ३१ मिनिटांत २१-१६ व २१-१३ अशा फरकाने फडशा पाडून थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ ताज्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये सायना नेहवाल हिने एका क्रमांकाने झेप घेतली आहे़ ती आता चौथ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे़पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात भारताच्या के़ श्रीकांतने कामगिरीत सातत्य राखताना थायलंडच्या तानोगसाक साईनसोमबुनसूकला ३९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१९, २३-२१ अशी धूळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली़या स्पर्धेत विजेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या भारताच्या पी़ व्ही़ सिंधूवर मात्र दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली़ तिला बिगरमानांकित जपानच्या नोजुमी ओकुहाराकडून २१-१७, १३-२१, २१-११ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला़ त्याआधी आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने जबरदस्त कामगिरी करताना दुसऱ्या फेरीत एकतर्फी विजय मिळविला़ सिंधूला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आता सायनाकडून जेतेपदाची अपेक्षा आहे़ सायनाला आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चिनी-तैपेईच्या ताई जु यिंगचा सामना करावा लागेल़ त्याआधी भारताच्या मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांना पुरुष दुहेरी गटात पराभवाचा सामना करावा लागला. तर, महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा व एकेरीत आर. एम. व्ही. गुरुसाई दत्त, पी़ कश्यप, अजय जयराम यांना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी धूळ चारून स्पर्धेबाहेर केले़ (वृत्तसंस्था)