शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

सायना, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: November 19, 2014 23:47 IST

: नुकताच चायना ओपनचा किताब आपल्या नावे करणारी भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल आणि के़ श्रीकांत यांनी हाँगकाँग ओपन बॅडमिंटनची उप उपांत्यपुर्व फेरी गाठली़

हाँगकाँग : नुकताच चायना ओपनचा किताब आपल्या नावे करणारी भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल आणि के़ श्रीकांत यांनी हाँगकाँग ओपन बॅडमिंटनची उप उपांत्यपुर्व फेरी गाठली़ महिला गटातील एकेरीत भारताच्या पी़व्ही़ सिंधू हिने प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत करीत आगेकूच केली़ मात्र महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांना पराभवाचा सामना करावा लागला़ अनुभवी सायनाने आपला फॉर्म कायम राखताना एकेरी सामन्यात अमेरिकेच्या जेमी सुबांधी हिचा अवघ्या २७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१७, २१-११ असा पराभव करीत पुढची फेरी गाठली़ पुरुष गटात श्रीकांत याने एकेरी लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना सातवे मानांकन प्राप्त चीनी तैपेईच्या चोउ तिएन चेनवर १८-२१, २२-२०, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवित थाटात पुढच्या फेरीत प्रवेश केला़महिला गटात पी़व्हि सिंधू हिने आक्रमक खेळ करीत केवळ ५२ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबुमरूंगपानला २१-१५, १६-२१, २१-१९ अशा फरकाने पराभूत केले़ पुरूष गटातील अन्य लढतीत मात्र भारताच्या अयज जयरामला पराभवाचे तोंड पहावे लागले़ जयराम चीनच्या चेंग लांग याच्याकडून १३-२१, ७-२१ अशा फरकाने पराभूत झाला़ स्पर्धेतील महिला दुहेरी गटात ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या जोडीला मलेशियाच्या यिन लू लिम आणि ली मेंग यिएन याच्याकडून अटीतटीच्या लढतीत २१-१६, १४-२१, २१-२३ ने पराभवाची नामुष्की ओढावली़ पुरुष गटातील दुहेरीत भारताच्या मनु अत्री आणि बी सुमी रेड्डी या जोडीला पुढची फेरी गाठण्यात अपयश आले़ (वृत्तसंस्था)