शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

सायना, सिंधूचा दमदार खेळ

By admin | Updated: September 25, 2014 03:50 IST

सायना नेहवाल आणि पी़ व्ही़ सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करीत महिला एकेरीच्या आपापल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला

इंचियोन : सायना नेहवाल आणि पी़ व्ही़ सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करीत महिला एकेरीच्या आपापल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला. सायनाने मकाऊच्या की यू तेंग लोचा अवघ्या २६ मिनिटांत २-० असा फडशा पाडून अंतिम १६ जणांमध्ये स्थान निश्चित केले. सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीच संधी दिली नाही आणि प्रत्येकी १३-१३ मिनिटे चाललेल्या दोन सेटमध्ये २१-१०, २१-८ अशी बाजी मारली. सिंधूनेही मकाऊच्या की वोंग किट लेगचा १९ मिनिटांत पराभव केला. सिंधूने ही लढत २१-७, २१-१३ अशी जिंकली. याव्यतिरिक्त भारताने महिला आणि पुरुष दुहेरी गटात आगेकूच केली आहे. महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी यांनी नेपाळच्या सिच्चया श्रेष्ठा व पूनम गुरुंग या जोडीवर १६ मिनिटांत २१-६, २१-४ असा विजय साजरा केला. पुरुष दुहेरीत सुमित रेड्डी आणि मनू अत्री यांनी मालदीवच्या नशीहू शराफुद्दीन व मोहंमद सरीम यांचा १९ मिनिटांत २१-७, २१-७ असा फडशा पाडून अंतिम १६ जणांमध्ये प्रवेश केला. अक्षय देवाळकर आणि प्रणय चोपडा या भारतीय जोडीने चीनच्या काई युन आणि फू हेफेंगवर २८ मिनिटांत २-० असा विजय मिळवला. (वृत्तसंस्था)