शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवालचे स्वप्न भंगले

By admin | Updated: March 9, 2015 01:29 IST

आॅलिम्पिक कास्यपदक विजेती बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिचे प्रतिष्ठित आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

बर्मिंगहॅम : आॅलिम्पिक कास्यपदक विजेती बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिचे प्रतिष्ठित आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनण्याचे स्वप्न आज भंगले. अंतिम सामन्यात तिला स्पेनच्या कारोलिना मारीन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित भारतीय खेळाडूकडे इतिहास रचण्याचा गोल्डन चान्स होता; परंतु पहिला गेम जिंकल्यानंतरही त्याचा फायदा ती घेऊ शकली नाही आणि एका तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन स्पेनच्या कारोलिना मारीन हिने सायनाला १६-२१, २१-१४, २१-७ असे पराभूत केले.या पराभवामुळे सायनला तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद (२00१) आणि प्रकाश पदुकोन (१९८0) यांची बरोबरी करण्यात अपयश आले. गोपीचंद आणि पदुकोन यांनी पुरुष गटात या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. सायना २00७ पासून आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत खेळत आहे. विशेष म्हणजे याआधी ती कधीही कारोलिनाकडून पराभूत झाली नव्हती आणि एक वेळ तर ती अंतिम सामन्यात सहज विजय मिळवेल असे वाटले होते; परंतु त्यानंतर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या खेळाडूने शानदार मुसंडी मारली आणि भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले. इसायनाबरोबर करोडो भारतीयांच्या शुभेच्छा होत्या. एवढेच नव्हे तर सचिन तेंडुलकरनेदेखील सोशल नेटवर्किंग साईटवर तिला शुभेच्छा दिल्या होत्या; परंतु सायना अपेक्षेनुसार कामगिरी करू शकली नाही. याआधी २0१0 आणि २0१३ मध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणारी सायना विजेतेपदाच्या जवळ जाऊनही यश मिळविण्यात अपयशी ठरली.