शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Actor Siddharth Tweet Saina Nehwal : सायना नेहवालवर ट्वीट केल्यानं रंग दे बसंतीचा अभिनेता अडचणीत, महिला आयोगानं दिले FIR चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:54 IST

Actor Siddharth Tweet Saina Nehwal : अभिनेता सिद्धार्थनं केलेल्या ट्वीटवरून महिला आयोगानं दिले FIR करण्याचे आदेश.

Actor Siddharth Tweet Saina Nehwal : साऊथचा अभिनेता सिद्धार्थ आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत केलेल्या एका ट्वीटवरून तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, त्यावर आता राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. तसंच सिद्धार्थवर एफआयआर दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.

सायना नेहवालनं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्वीट केलं होतं. यामध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडलं, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते, असं ट्वीट तिनं केलं होतं. याच ट्वीटव अभिनेता सिद्धार्थनं ट्वीट केलं होतं. तसंच यामध्ये त्यानं द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे शेम ऑन यू रिहाना असं लिहिलं होतं.

लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला. तसंच महिला आयोगानंही यासंदर्भात तक्रार केली. वादानंतर सिद्धार्थनं स्पष्टीकरण देत आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतल्याचं तो म्हणाला होता. तसंच कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

महिला आयोगाची कारवाई  या प्रकरणानंतर महिला आयोगाकडून सिद्धार्थला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच आयटी अॅक्ट अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासही सांगण्यात आलं आहे. महिला आयोगानं ट्विटरला हे ट्वीट हटवण्यासंदर्भातही कारवाई करण्यास सांगितलं आहे. याशिवाय महिला आयोगानं मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. आयोग याप्रकरणी कारवाई करत असल्याची माहिती महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरद्वारे दिली. सिद्धार्थनं यापूर्वी रंग दे बसंती या चित्रपटातही भूमीका साकारली होती. यापूर्वी त्याच्या वक्तव्य, ट्वीटवरून वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालTwitterट्विटर