शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

By admin | Updated: July 7, 2017 11:20 IST

विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे

ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. 7 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपली रेकॉर्डब्रेक कामगिरी कायम ठेवली असून अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात शतकी खेळी करत विराट कोहलीने संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने अंतिम सामना जिंकत मालिकाही जिंकली. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना आपलं 18 वं शतक पुर्ण केलं. यासोबतच विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डसोबत विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
 
आणखी वाचा - 
विराट शतक! भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बेयरस्टॉ जखमी
पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली
 
जानेवारी महिन्यात धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून देणा-या सचिन तेंडुलकरच्या 14 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहलीने मोडला होता. कोहलीने यावेळी 11 धावांची खेळी केली. ही त्याच्या वनडे करिअरमधील 28 वं शतक होतं. तर अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी केलेलं हे पाचवं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरने आपल्या वनडे करिअरमध्ये धावांचा पाठलाग करताना एकूण 17 शतकं केली होती. 
एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकांच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीने आता सनथ जयसुर्यांची बरोबरी केली आहे. आता तो फक्त रिकी पाँटिंग (31) आणि सचिन तेंडुलकरच्या (49) मागे आहे. सचिन तेंडूलकरने 232 सामन्यांमध्ये 17 शतकं केली होती, तिथे विराट कोहलीने फक्त 102 सामन्यांमध्ये 18 शतकं केली आहेत. 
धावांचा पाठलाग करताना शतक करण्याच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानचा तिसरा क्रमांक आहे. त्याने 116 सामन्यांमध्ये 11 शतकं केली आहेत.
यासोबतच वेस्ट इंडिजविरोधात खेळताना त्यांच्याच मायभूमीवर दोन शतकं करणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी फक्त राहुल द्रविडने कर्णधार असताना वेस्ट इंडिजविरोधात शतक केलं होतं. वेस्ट इंडिजविरोधात शतक करणा-या खेळाडूंमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. 
भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा केला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या 205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.