शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा रंगणार ‘रॉयल’ लढत...

By admin | Updated: April 29, 2015 01:34 IST

आयपीएलमध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

बेंगळुरू : उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या लढतीत पराभव स्वीकारणारा राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलमध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.उभय संघांदरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्सचा २३ चेंडू ९ गडी राखून पराभव केला होता. राजस्थान संघाला केवळ १३० धावा फटकावता आल्या होत्या. शेन वॉटसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ आता पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक आहे.आठ सामन्यांत पाच विजय, दोन पराभव व एक रद्द झालेल्या सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स ११ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आठ सामन्यांत ६ गुणांची कमाई करणारा बेंगळुरू संघ चौथ्या स्थानी आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या राजस्थान संघाला त्यानंतर सलग दोन पराभव स्वीकारावे लागले. राजस्थान संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी अजिंक्य रहाणे व आॅस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे राजस्थानचे फलंदाज शानदार फॉर्मात आहेत. या दोन्ही खेळाडूंकडून संघाला बुधवारी चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. कर्णधार शेन वॉटसन व अष्टपैलू दीपक हुड्डा यांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. ४३ वर्षांच्या लेगस्पिनर प्रवीण तांबेने छाप सोडली आहे. ख्रिस मॉरिस व जेम्स फॉल्कनेर यांच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. दुसऱ्या बाजला बेंगळुरू संघाची या स्पर्धेतील कामगिरी संमिश्र ठरली आहे. संघाने तीन सामने जिंकले असून, तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर बेंगळुरूने राजस्थान व दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव करीत स्पर्धेत पुनरागमन केले आहे. गृहमैदानावर त्यांचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. आतापर्यंत तीन सामन्यांत (सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज) संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. (वृत्तसंस्था)रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक, एस. बद्रीनाथ, डॅरेन सॅमी, मिशेल स्टार्क, निक मेडिन्सन, वरुण अ‍ॅरोन, युजवेंद्र चहल, रिली रोसोयू, विजय झोल, योगेश ताकवाले, अबू नेचिम अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, संदीप वॉरियर, मानविंदर बिस्ला, इक्बाल अब्दुल्ला, सीन एबट, अ‍ॅडम मिल्ने, डेव्हिड विसे, जलज सक्सेना, सरफराज खान, शिशिर बवाने.राजस्थान रॉयल्स शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुळकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनेर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, रजत भाटिया, संजू सॅम्सन, स्टिव्हन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, जुआन थेरोन, बरिंदर सिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू.