शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल स्ट्रायकर्सची विजयी सलामी

By admin | Updated: June 28, 2016 22:51 IST

अलोक कुमार आणि सौरव कोठारी या कसलेल्या खेळाडूंनी केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर रॉयल स्ट्रायकर्स संघाने स्नूकर प्रीमियर लीग स्पर्धेत विजयी सलामी देताना सॅफरॉन आर्मीचा

स्नूकर लीग : अलोक व सौरव यांचा निर्णायक खेळ

मुंबई : अलोक कुमार आणि सौरव कोठारी या कसलेल्या खेळाडूंनी केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर रॉयल स्ट्रायकर्स संघाने स्नूकर प्रीमियर लीग स्पर्धेत विजयी सलामी देताना सॅफरॉन आर्मीचा ३-१ असा पाडाव केला. अन्य एका चुरशीच्या सामन्यात एसपीजी डार्क नाइट्स संघाने बाजी मारताना यूएनएनआयसीए चँलेंजर्स संघाला ३-२ असे नमवले.महाराष्ट्र बिलियर्स आणि स्नूकर संघटनेच्या मान्यतेने गरवारे क्लब हाऊस येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या ह्यअह्ण गटात सॅफरॉन आर्मीच्या पुष्पेंदर सिंगने धक्कादायक सुरुवात करताना कसलेल्या हसन बदामीला ३१-९, ४४-५ असे नमवून खळबळ माजवली. मात्र यानंतर रॉयल स्ट्रायकर्सच्या सौरवने आशुतोष पांडेला नमवून संघाला बरोबरी आणून दिली. तर अरंताक्सा संचिस - निशांत डोस्सा यांनी कार्तिक झवेरी - सौमिल करकेरा यांना नमवल्यानंतर अलोकने अनुज उप्पलला धक्का देत रॉयल्सच्या ३-१ अशा विजयावर शिक्का मारला.तर यानंतरच्या चुरशीच्या सामन्यात चँलेंजर्स संघाने एसपीजी डार्क नाइट विरुध्द पिछाडीवरुन दमदार पुनरागमन करुन २-१ असे वर्चस्व घेतले होते. मात्र शिवम अरोरा आणि कमल चावला यांनी आपआपल्या एकेरी लढतीत निर्णायक बाजी मारताना एसपीजीचा ३-२ असा रोमांचक विजय साकारला. (क्रीडा प्रतिनिधी)