शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव

By admin | Updated: January 24, 2015 01:34 IST

ग्रॅण्ड स्लॅमचा बादशाह व किताबाचा प्रबळ दावेदार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला शुक्रवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभवाचे तोंड पाहावे लागले.

मेलबर्न : ग्रॅण्ड स्लॅमचा बादशाह व किताबाचा प्रबळ दावेदार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला शुक्रवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभवाचे तोंड पाहावे लागले. इटलीच्या बिगरमानांकित आंद्रियस सेप्पीने त्याला पराभवाची चव चाखवली. दुसरीकडे स्पेनच्या राफेल नदालने इस्राईलच्या डूडी सेलाचा, तर महिला एकेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हाने कजाकिस्तानच्या झरिना डियासचा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यांमध्ये सहाव्या मांनाकित ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने पराभव टाळण्यात यश मिळवले आणि त्याने पोर्तुगालच्या जोआओ सोसाचा सरळ सेटमध्ये ६-१, ६-१, ७-५ असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. मरेला पुढच्या फेरीत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवशी मुकाबला करावा लागेल. दिमित्रोवने मार्कोस बगदातिसचा ४-६, ६-३, ३-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्दीचनेही सर्बियाच्या विक्टर ट्रोएकीचा ६-४, ६-३, ६-४ असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)