शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रिअल माद्रीदचा झंझावात

By admin | Updated: October 24, 2014 03:50 IST

रोनाल्डाने पहिला गोल नोंदविल्यानंतर करिम बेंजेमाने दोन गोल करून या विजयात मोलाचा वाटा उचलला.

लिव्हरपूल : क्रिस्टीआनो रोनाल्डोच्या प्रेरणादायी गोलने रिअल माद्रिदने गुरुवारी चॅम्पियन्स लीगच्या ‘ब’ गटातील लढतीत यजमान लिव्हरपूलचा ३-० असा धुव्वा उडविला आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाकडे आगेकूच केली. रोनाल्डाने पहिला गोल नोंदविल्यानंतर करिम बेंजेमाने दोन गोल करून या विजयात मोलाचा वाटा उचलला.रोनाल्डोने आपली मॅजिकल कामगिरी कायम राखत या लढतीत वर्चस्व गाजवले. २३व्या मिनिटाला रोनाल्डो आणि बेंजेमा यांच्यातील अचूक ताळमेळ पाहायला मिळाला. रोनाल्डोकडून बेंजेमा आणि पुन्हा रोनाल्डो असा चेंडू पास होत पुढे जेम्स रॉड्रिग्जकडे गेला. तोपर्यंत रोनाल्डो गोलपोस्टजवळ पोहोचला होता आणि रॉड्रिग्जने चेंडू रोनाल्डोला पास करून त्याला पहिला गोल करण्याची संधी दिली. फॉर्मात असलेल्या रोनाल्डोने गोल करून माद्रिदला आघाडी मिळवून दिली. त्यात ३०व्या मिनिटाला बेंजेमाने भर टाकली. राईट टू लेफ्ट अशी रणनीती आखत रोनाल्डो, एस्को, टोनी क्रुस आणि बेंजेमा यांनी हा गोल केला आणि माद्रिदची आघाडी २-० अशी मजबूत केली. पुन्हा एकदा बेंजेमाने ४१व्या मिनिटाला गोल करून संघाला मध्यांतरापर्यंत ३-० असे फ्रंटसिटवर बसवले. क्रुस याने दिलेला कॉर्नर पेपेने बेंजेमाकडे पास केला आणि बेंजेमाने तो गोलमध्ये रूपांतरित केला. मध्यांतरानंतर लिव्हरपूलकडून फार चुरस पाहायला मिळाली नाही. त्यांनी पराभव पत्करलाच होता. या विजयामुळे माद्रिदने सहा गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आहे .या विजयानंतर माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोट्टी म्हणाले, आमच्यासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा आहे. संघाने अप्रतिम खेळ केला. आम्ही अशा संघाविरुद्ध खेळत होतो की, ते कधीही आमच्यासमोर अडचण निर्माण करू शकले असते, परंतु आम्ही त्यांना तसे करण्यास रोखले. संघाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीलाच जाते.