शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

रेश्माला सुवर्ण, तर सोनालीला रौप्य

By admin | Updated: November 6, 2016 02:49 IST

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी तब्बल १४ पदके जिंकली. यात ग्रीको रोमन शैलीत पाच, महिला फ्रीस्टाईलमध्ये सहा आणि पुरुष फ्रीस्टाईलमध्ये

सिंगापूर : राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी तब्बल १४ पदके जिंकली. यात ग्रीको रोमन शैलीत पाच, महिला फ्रीस्टाईलमध्ये सहा आणि पुरुष फ्रीस्टाईलमध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत कोल्हापूरची मल्ल रेश्मा माने हिने सुवर्णपदक आणि बीडच्या सोनाली तोडकरने रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कृर्ष काळेने कांस्य पदक जिंकले.कोल्हापूरची सुवर्णकन्या रेश्मा अनिल माने हिने ६३ किलो वजनी गटात सिंगापूरच्या चरमायनी हुगीटिव्हना आणि भारताच्या गार्गी यादवला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रेश्माने गेल्या आठवड्यात गोंडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रकुलची दावेदारी सिद्ध केली होती. मूळची बीडची असलेली व एनआयएस कोच अश्विनी बोराडे यांच्याकडे सराव करणारी मल्ल सोनाली तोडकरने ५८ किलो वजनी गटात आॅस्ट्रेलियन महिला मल्लावर विजय मिळविला; मात्र अंतिम फेरीत तिला भारताच्या मंजूकडून पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला गटात अन्य लढतीत रितू (४८ किलो), पिंकी (५३ किलो), ललिता (५५ किलो), मंजू (५८ किलो), पिंकी (६९ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकली. पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकारात पाचही वजनी गटांतील सुवर्ण आणि रौप्यपदकांवर भारताने कब्जा केला. ६६ किलो गटात मनीषने सुवर्णपदक, तर रविंदरने रौप्यपदक पटकाविले. मुलांच्या ५७ किलो गटात भारताच्या उत्कर्ष काळेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ८0 किलो गटात हरप्रीत सिंहने सुवर्ण आणि रविंदर खत्रीने रौप्यपदक मिळविले. ८५ किलो गटात प्रभपालने सुवर्ण, तर यशपालने रौप्यपदकावर कब्जा केला आणि १३0 किलो गटात नवीनने सुवर्ण, तर मनवीने रौप्यपदकाला गवसणी घातली.(वृत्तसंस्था)सोनालीचे वजन ५३ किलो असतानाही मी तिला ५८ किलो गटात खेळविली. तिच्या परिश्रमावर माझा विश्वास होता. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवून तिने माझा विश्वास सार्थ ठरविला. सोनाली ही गुणी मल्ल असून, ती आॅलिम्पिकमध्ये देशाला निश्चित पदक मिळवून देईल यात शंका नाही. - अश्विनी बोराडे, एनआयएस कोच.आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये चांगले यश मिळाले; पण देशासाठी आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणे हेच माझे ध्येय आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व कुटुंबीयांच्या पाठबळावर माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागतील ते कष्ट घेण्याचीही माझी तयारी आहे. - रेश्मा माने, महिला कुस्तीपटू रेश्माची ही सुरुवात आहे. लहानपणापासूनच ती माझ्याकडे सराव करीत आहे. तिच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी आहे. माझ्याकडे जी मुले शिकतात, त्यांनी माझ्यापेक्षाही मोठे व्हावे, हीच माझी पहिल्यापासून इच्छा असते आणि रेश्मा हे करून दाखवीत आहे, याचा मला एक गुरू म्हणून अभिमान आहे.- राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते