शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

राहुल आवारे होणार पोलीस उपअधीक्षक; ललिता बाबर उपजिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 12:38 AM

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारीपदाचा मान मिळाला आहे.

पुणे : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारीपदाचा मान मिळाला आहे. यांच्यासह ३२ खेळाडूंची थेट शासकीय सेवेत निवड झाली असून, त्यात ९ दिव्यांग खेळाडूंचाही समावेश आहे.खेळाच्या माध्यमातून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नियुक्ती मिळावी यासाठी मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची ३ आॅगस्ट २०१८रोजी बैठक झाली. त्यात ३२ खेळाडूंना थेट सरकारी नोकरीत नियुकत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिपाई, लिपिक, क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडा अधिकारी, नायब तहसिलदार, पोलीस उपअधिक्षक आणि उपजिल्हाधिकारी अशा पदांवर खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या पदस्थापनेचे आदेश संबंधित विभागाने काढावेत असा राज्यसरकारने दिला आहे.राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू आवारे याने २०११मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ पदक संपादन केले होते. तर, २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले पाहीजे. ललिता बाबरने २०१५ साली वुहान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ सालच्या स्पर्धेत रौप्य पदक संपादन केले होते.पोलीस उपअधिक्षकपदी निवड झाल्यानंतर लोकमतशी बोलताना आवारे म्हणाला, लहानपणापासून पोलीस बनण्याचे स्वप्न होते. ते या निमित्ताने पूर्ण झाले. मात्र या पुढेही कुस्तीचा सराव सुरु ठेवून, आॅलिम्पिक पदक मिळवून देण्याचा मानस आहे.लहानपणी वडिलांकडे धरला होता ‘वर्दी’चा हट्ट - आवारेकारगील युद्धामुळे देशसेवा आणि वर्दीचे आकर्षण वाढले. मी साधरण तिसरी चौथीत असतानाची गोष्ट आहे. माझे परिचित पोलिस खात्यात होते. त्यामुळे वडिलांकडे तशीच पोलीस वर्दी हवी असा हट्ट धरला होता. त्यावेळी घरची परिस्थिती हट्ट पुरविण्याची नव्हती. तरी देखील वडीलांनी तसा पोषाख आणून दिला.आज खेळाच्या माध्यमातून मला खरीखुरी वर्दी मिळाली आहे. ज्या प्रमाणे मी खेळाच्या माध्यमातून देशाचा नावलौकीक केला. त्याप्रमाणे पोलीसांची वर्दी घालून समाजाची सेवा करेन. तूर्तास देशाला आॅलिम्पिक पदक मिळवून देण्याचा मानस आहे. त्याच्या तयारीत खंड पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल आवारे याने लोकमतकडे दिली.दिव्यांग खेळाडूखेळाडूंची नावे खेळाचा प्रकार पदप्रकाश मोहारे पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारीसुकांत कदम बॅडमिंटन ता. क्रीडा अधिकारीमार्क धरमाई बॅडमिंटन ता. क्रीडा अधिकारीरुही सतीश शिंगाडे बॅडमिंटन ता. क्रीडा अधिकारीसुयश जाधव जलतरण क्रीडा मार्गदर्शककांचनमाला पांडे जलतरण क्रीडा मार्गदर्शकइंदिरा गायकवाड पॉवरलिफ्टींग लिपिकदिनेश बालगोपाल टेबल टेनिस लिपिकओम लोटलीकर टेबल टेनिस लिपिकथेट नियुक्त झालेले खेळाडूखेळाडू खेळाचा प्रकार पदराहुल आवारे कुस्ती पोलीस उपअधीक्षकललिता बाबर धावपटू उपजिल्हाधिकारी,महसूल-वन विभागअमित निंबाळकर पॉवरलिफ्टींग नायब तहसिलदार,महसूल व वनजयलक्ष्मी धनुर्विद्या ता. क्रीडा अधिकारीसारीकोंडाभक्ती आंब्रे पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारीअंकिता मयेकर पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारीसारीका काळे खो-खो ता. क्रीडा अधिकारीसुप्रिया गाढवे खो-खो ता. क्रीडा अधिकारीविजय शिंदे पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारीसचिन चव्हाण रायफल शुटींग ता. क्रीडा अधिकारीसंजीवनी जाधव मैदानी ता. क्रीडा अधिकारीसायली जाधव कबड्डी ता. क्रीडा अधिकारीमोनिका आथरे मैदानी लिपिकस्वप्नील तांगडे तलवारबाजी लिपिकआनंद थोरात जिम्नॅस्टीक लिपिकसिद्धार्थ कदम जिम्नॅस्टीक लिपिकमानसी गावडे जलतरण लिपिकनेहा साप्ते रायफल शुटींग लिपिकरोहित हवालदार जलतरण लिपिकदेवेंद्र वाल्मिकी हॉकी लिपिकयुवराज जाधव खो-खो शिपाईबाळासाहेब खो-खो शिपाईपोकार्डेकविता घाणेकर खो-खो शिपाई

टॅग्स :Policeपोलिस