शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘आर. पी.’ची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: January 17, 2017 07:47 IST

आर. पी. सिंगची गेल्या दोन सत्रांतील ड्रेसिंग रूममधील उपस्थिती संघाला रणजी स्पर्धेत पहिले जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली

नवी दिल्ली : मूळचा उत्तर प्रदेशचा, परंतु सध्या गुजरातकडून खेळणारा अनुभवी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगची गेल्या दोन सत्रांतील ड्रेसिंग रूममधील उपस्थिती संघाला रणजी स्पर्धेत पहिले जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली, अशी प्रतिक्रिया टीम इंडिया व गुजरातचा फिरकीपटू अक्षर पटेल याने व्यक्त केली. अक्षर म्हणाला, ‘प्रशिक्षक विजय पटेल आणि कर्णधार पार्थिव पटेल यांच्याव्यतिरिक्त आर. पी. सिंगच्या उपस्थितीमुळे सांघिक कामगिरी करता आली. आर. पी.मुळे ड्रेसिंग रूममध्ये व्यावसायिकपणा आला. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तो सदैव सज्ज असायचा. तो दुसऱ्या राज्यातील क्रिकेटपटू आहे, असे आम्हाला कधीच जाणवले नाही.’भारत आणि इंग्लंड यांच्या पाचव्या कसोटीदरम्यान अक्षरच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेत केवळ चार सामने खेळता आले. दरम्यान, तो पूर्णवेळ रणजी संघासोबत होता. गुजरातने अंतिम लढतीत मुंबई संघाचा पराभव करीत रणजी स्पर्धेत जेतेपद पटकावले. अक्षर पुढे म्हणाला, ‘आम्ही १९ वर्षांखालील गटापासून कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे जेतेपद पटकावता आले. जास्तीत जास्त खेळाडू ज्युनिअर क्रिकेट एकत्र खेळले आहेत. सीनिअर पातळीवर एकत्र खेळताना त्याची मदत होते.’>आर. पी. केवळ पाच सामने खेळला, पण संघाला गरज असताना त्याने महत्त्वाचे बळी मिळवून दिले. त्याचा सर्वाधिक प्रभाव मैदानाबाहेर दिसला. तो फलंदाजांची मानसिकता ओळखणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडून आम्हाला हे शिकायला मिळाले. तो मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असतो आणि सरावादरम्यान खेळाडूंना मदत करतो. - अक्षर पटेल