Tata Steel Chess Masters 2025: युवा जग्गजेत्या डी. गुकेशला शह देत आर. प्रज्ञाननंदा झाला 'चॅम्पियन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 00:41 IST2025-02-03T00:38:55+5:302025-02-03T00:41:21+5:30

Tata Steel Chess Masters 2025 Winner: विश्वनाथन आनंद या दिग्गज बुद्धिबळपटूनंतर ही स्पर्धा गाजवणारा प्रज्ञाननंदा हा दुसरा भारतीय ठरलाय.

R Praggnanandhaa beats D Gukesh in sudden death to clinch maiden Tata Steel Masters 2025 | Tata Steel Chess Masters 2025: युवा जग्गजेत्या डी. गुकेशला शह देत आर. प्रज्ञाननंदा झाला 'चॅम्पियन'

Tata Steel Chess Masters 2025: युवा जग्गजेत्या डी. गुकेशला शह देत आर. प्रज्ञाननंदा झाला 'चॅम्पियन'

Tata Steel Chess Masters 2025 Winner: नेदरलँड्समधील आन जी विक येथे रंगलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदाने नुकताच विश्वविजेता ठरलेल्या डी. गुकेशला शह देत फायनल बाजी मारली आहे. अतिशय रोमहर्षक लढतीत ट्राय ब्रेकरनंतर  २-१ अशी बाजी मारत आर. प्रज्ञाननंदाने टाटा स्टील या प्रतिष्ठित स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद या दिग्गजानंतर  ही स्पर्धा गाजवणारा प्रज्ञाननंदा हा दुसरा भारतीय ठरलाय. विशेष म्हणजे त्याने आपल्याच देशाच्या युवा विश्व विजेत्याला पराभूत करत ही स्पर्धा जिंकली आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टाय ब्रेकरमध्ये बरोबरी, 'सडन डेथ प्ले'त प्रज्ञाननंदा ठरला विजेता

या स्पर्धेतील १३ व्या फेरीत दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. दोघांनी संयुक्त आघाडी घेतल्यावर सामना टायब्रेकरमध्ये गेला. यात पहिल्या आणि दुसऱ्या टायब्रेकर गेममध्ये दोघांनी  १-१ अशी  बरोबरी केल्यामुळे या लढतीचा निकाल 'सडन डेथ प्ले'पर्यंत पोहचला. या फेरीत  प्रज्ञाननंदाने बाजी मारत २-१  अशा फरकाने जेतेपदावर नाव कोरले.

टायब्रेकर गेम १:

पहिल्या ट्रायब्रेकरमध्ये प्रज्ञाननंदाने काळ्या सोंगड्यांसह चांगली सुरुवात केली. पण डी. गुकेशने गेमच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत प्रज्ञाननंदाला विचार करायला भाग पाडले. या टायब्रेकरमधील काही सेकंद बाकी असताना प्रज्ञाननंदाने प्याद्यासह चूक केली. ही संधी साधत गुकेशने अचूक चाल खेळली अन् पहिल्या टायब्रेकरमध्ये विजय नोंदवला.

टाय-ब्रेकर गेम २:

दुसऱ्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञाननंदा पांढऱ्या सोंगड्यासह खेळताना दिसले. पांढऱ्या मोहऱ्यांसह तो सुरुवातीपासून फायद्यात होता.  हळूहळू त्याने या गेममध्ये आपली पकड मजबूत केली. त्याने गुकेशला विचारात टाकले. मग शेवटचे १० सेकंद बाकी असताना प्रज्ञाननंदानं सर्वोत्तम चाल खेळली अन् या गेममध्ये बाजी मारत दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये बाजी मारत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर  'सडन डेथ' गेममध्ये डी. गुकेशला एक चूक महागात पडली. दुसरीकडे इथंच नामी संधी साधत अखेर प्रज्ञाननंदानं बाजी मारली.

Web Title: R Praggnanandhaa beats D Gukesh in sudden death to clinch maiden Tata Steel Masters 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.