भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुखरूप भारतात परतली; 'या' लोकांचे मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:23 IST2026-03-03T14:18:59+5:302026-03-03T14:23:46+5:30

Iran-Israel War Impact: बर्मिंगहॅमला जाताना इराण-इस्रायल युद्धाच्या छायेत दुबई विमानतळावर अडकलेली भारतीय शटलर पीव्ही सिंधू आता सुखरूप बंगळुरूमध्ये घरी पोहोचली आहे. २८ फेब्रुवारीपासून ती दुबईत अडकली होती, जिथे विमानतळाजवळ स्फोट झाल्याचे थरारक अनुभव तिने शेअर केले होते.

PV Sindhu Returns Home Safely After Being Stranded in Dubai; Misses All England Open Due to Iran-Israel Conflict | भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुखरूप भारतात परतली; 'या' लोकांचे मानले आभार!

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुखरूप भारतात परतली; 'या' लोकांचे मानले आभार!

इस्रायल- इराण युद्धामुळे दुबई विमानतळावर अडकलेली भारताची स्टार शटलर आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू सुखरूप भारतात परतली. मात्र, या सर्व गोंधळामुळे तिचे यंदाच्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. याबद्दल पीव्ही सिंधूने खंत व्यक्त केली.

पीव्ही सिंधू ३ मार्चपासून बर्मिंगहॅम येथे सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेसाठी रवाना झाली. ती दुबईमार्गे बर्मिंगहॅमला जात असतानाच, इस्रायल आणि अमेरिकेने  इराणवर हल्ला केला. या युद्धामुळे अरब अमिरातीतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. त्यामुळे २८ फेब्रूवारीपासून पीव्ही सिंधू दुबईतच अडकली होती. अनेक दिवसांच्या अनिश्चिततेनंतर ती आज बंगळुरू येथील आपल्या घरी सुरक्षित पोहोचली. 

घरी परतल्यानंतर सिंधूने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या. तिने लिहिले की, "मी सुरक्षितपणे घरी परतले आहे. गेले काही दिवस खूप कठीण होते, पण आता मी सुरक्षितपणे घरे परतले असून सध्या विश्रांती घेण्याची आणि स्वतःला पुन्हा रिसेट करण्याची वेळ आहे. या कठीण काळात मदत करणाऱ्या दुबई विमानतळ अधिकारी, ग्राउंड टीम, इमिग्रेशन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते, जे शब्दांत मांडणे कठीण आहे."

पीव्ही सिंधूला या स्पर्धेला मुकावे लागले असले तरी, भारताचे इतर काही शटलर पर्यायी मार्गांनी वेळेवर बर्मिंगहॅमला पोहोचले आहेत. यात प्रामुख्याने लक्ष्य सेन आणि युवा खेळाडू आयुष शेट्टी यांचा समावेश आहे. लक्ष्य सेनचा सामना पहिल्या फेरीत चीनच्या अव्वल खेळाडू शी युकी याच्याशी होणार आहे. आयुष शेट्टीचा सामना इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याच्याशी होईल.

Web Title : दुबई में फंसी पीवी सिंधु सुरक्षित भारत लौटीं, जताया आभार

Web Summary : इजरायल-ईरान युद्ध के कारण दुबई में फंसी स्टार बैडमिंटन खिलाड़ी पीवी सिंधु सुरक्षित भारत लौट आईं। ऑल इंग्लैंड ओपन में खेलने का मौका चूकने पर उन्होंने निराशा व्यक्त की। उन्होंने दुबई हवाई अड्डे के कर्मचारियों को उनकी मदद के लिए धन्यवाद दिया। लक्ष्य सेन और आयुष शेट्टी बर्मिंघम पहुंचे।

Web Title : PV Sindhu Returns to India Safely After Dubai Airport Delay

Web Summary : Star badminton player PV Sindhu safely returned to India after being stranded in Dubai due to the Iran-Israel conflict, missing the All England Open. She thanked Dubai airport staff for their assistance during the difficult period. Lakshya Sen and Ayush Shetty reached Birmingham for the tournament.