ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा झाला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:26 IST2024-12-14T18:24:18+5:302024-12-14T18:26:16+5:30
PV Sindhu Engagement Photo Album : आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) सोबत मोठ्या दिमाखात पार पडला साखरपुडा

ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा झाला साखरपुडा
PV Sindhu Engagement Photo Album : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती स्टार भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचा आज साखरपुडा झाला. शनिवारी (१४ डिसेंबर) तिचा साखरपुडा सोहळा आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) सोबत मोठ्या दिमाखात पार पडला. सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली. सिंधूच्या लग्नाचे कार्यक्रम २० डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनही होणार आहे.
२२ डिसेंबरला होणार लग्नसोहळा
सिंधू आणि व्यंकट जोडी २२ डिसेंबरला उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. सिंधूच्या लग्नाची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी लखनौमधील सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर केली. सिंधूच्या लग्नाचा सोहळा २० डिसेंबरला उदयपूरमध्ये सुरू होणार असून २२ डिसेंबरला लग्न होणार आहे. या सोहळ्यासाठी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयला सांगितले की, दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिन्यापूर्वीच ठरले. जानेवारीपासून सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे लग्नासाठी हीच वेळ योग्य आहे.