शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

‘पंजाब-हैदराबाद’ संग्राम आज

By admin | Updated: April 27, 2015 01:18 IST

‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज,

मोहाली : ‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज, सोमवारी लढत होणार आहे. उभय संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असल्यामुळे लढत रंगतदार होईल, अशी चाहत्यांना आशा आहे.गतउपविजेत्या पंजाब संघाला सहापैकी चार लढतींत पराभव स्वीकारावा लागला असून, गुणतालिकेत हा संघ तळाच्या स्थानावर आहे. हैदराबाद संघानेही चार सामने गमावले असले तरी सरस नेटरनरेटच्या आधारावर हा संघ पंजाबपेक्षा वरच्या स्थानी आहे. उभय संघांना गत सामन्यांमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पंजाब संघाला चेन्नईविरुद्ध दारूण पराभव स्वीकारावा लागला. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाचा डाव ९ बाद ९५ धावांत रोखला गेला. ‘आयपीएल’च्या आठ सत्रांमध्ये ही दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली. कागदावर बलाढ्य भासत असलेली पंजाब संघाची फलंदाजी या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरली. रविवारी रात्री पंजाबच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना केवळ ४९ धावा करता आल्या. वीरेंद्र सेहवाग. डेव्हिड मिलर, शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार जॉर्ज बेली संघात परतल्यामुळे रविवारच्या सामन्यात मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली. परंतु, बेलीलाही काही चमक दाखविता आली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पंजाबच्या गोलंदाजांचीही कामगिरी निराशाजनक ठरली. वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनही सपशेल अपयशी ठरला आहे. त्याने शनिवारी चार षटकांत ४० धावा बहाल केल्या आणि बळींचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. दुसऱ्या बाजूचा विचार करता हैदराबाद संघही अडचणीत आहे. हैदराबादची फलंदाजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर व सलामीवीर शिखर धवन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. या दोघांची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे; पण मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजांनी यापूर्वीच्या लढतीच्या तुलनेत शनिवारी चांगली कामगिरी केली. डेल स्टेन व ट्रेंट बोल्ट यांनी चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)