Pro Kabaddi: U Mumba win over Patna Pirates | प्रो कबड्डी : यू मुम्बाने दिला पटणाला धक्का
प्रो कबड्डी : यू मुम्बाने दिला पटणाला धक्का

अहमदाबाद : सांघिक खेळाचे दमदार प्रदर्शन करताना यू मुम्बाने विजयी मार्गावर पुनरागमन करताना बलाढ्य पटणा पायरेट्सचा ३४-३० असा पराभव केला. या शानदार विजयासह यू मुम्बाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.


एका अरेना स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात रोहित बलियान आणि अतुल एमएस यू मुम्बच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रोहितने ९, तर अतुलने ८ गुणांची वसूली केली. स्टार संदीप नरवालनेही अष्टपैलू खेळ करत ६ गुण मिळवले. मध्यंतरालाच मुंबईकरांनी २२-९ अशी भलीमोठी आघाडी घेत चित्र स्पष्ट केले.


मात्र यानंतर पायरेट्सने जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात रंग
भरले. प्रदीप नरवाल, मोहम्मद मघसोदलौ यांनी मुंबईकरांना चांगलेच सतावले. मात्र त्यांची झुंज अपयशीच ठरली. दोन्ही संघांनी एकमेकांवर प्रत्येकी एक लोण चढवला. मात्र चढाईमध्ये मुंबईने राखले वर्चस्व निर्णायक ठरले.


Web Title: Pro Kabaddi: U Mumba win over Patna Pirates
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.