Pro Kabaddi: Jaipur Pink Panthers win in conditional clash | प्रो कबड्डी : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा विजय

प्रो कबड्डी : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा विजय

मुंबई : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलाईव्हासवर 28-26 असा विजय मिळवला. हा सामना अखेरच्या मिनिटापर्यंत चांगलाच रंगला, पण अखेर जयपूरने या सामन्यात बाजी मारली

जयपूरपेक्षा तमिळच्या संघाचे या सामन्यात चांगल्या चढाया केल्या, पण त्यांना चांगल्या पकडी करता आल्या नाहीत. त्यामुळे तमिळ संघाच्या हातून हा सामना निसटला. जयपूरला चढाईमध्ये 14 तर तमिळला 16 गुण मिळवता आले. त्याचबरोबर तमिळच्या संघाने जयपूरवर एक लोण चढवत दोन गुणांची कमाईदेखील केली. पण त्यांना चांगला बचाव न करता आल्यामुळेच पराभव पत्करावा लागला.

Image

जयपूरच्या संघाने पकडींच्या जोरावर हा सामना जिंकला. कारण जयपूरने पकडींमध्ये 11 गुण मिळवले, पण तमिळ संघाला पकडींमध्ये फक्त सहा गुणच मिळवता आले. 

पुणेरी पलटण पडली भारी, बंगळुरुवर मिळवला विजय
प्रो कबड्डीमध्ये आज पुणेरी पलटण बंगळुरु बुल्सवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या संघाने बंगळुरुच्या संघावर 31- 23 असा सहज विजय मिळवला.

या सामन्यात बंगळुरुच्या संघाने पुण्यापेक्षा जास्त गुण आक्रमण करताना मिळत होते. पण पुण्याच्या संघाने यावेळी दमदार पकडींच्या जोरावर हा सामना जिंकला. चढायांमध्ये बंगळुरुने 16 तर पुण्याने 13 गुण मिळवले होते. बंगळुरुच्या संघाने या सामन्यात जोरदार चढाया केल्या. पण चांगला बचाव न करू शकल्याने बंगळुरुला पराभव पत्करावा लागला.

पुण्याच्या संघाला चढायांमध्ये बंगळुरुपेक्षा जास्त गुण मिळवता आले नाहीत. पण पुण्याने यावेळी चांगला बचाव केला आणि त्यांनी पकडींमध्ये जास्त गुण मिळवत बंगळुरुवर विजय मिळवला. पकडींमध्ये बंगळुरुला फक्त सहा गुण मिळवता आले, तर पुण्याने 16 गुण मिळवले. त्याचबरोबर पुण्याच्या संघाने बंगळुरुवर एकदा लोण चढवत दोन गुणांची कमाई केली.

Web Title: Pro Kabaddi: Jaipur Pink Panthers win in conditional clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.