Pro Kabaddi 2019 : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाला हैदराबादमधून सुरुवात, जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 16:14 IST2019-07-15T16:14:09+5:302019-07-15T16:14:37+5:30
pro kabaddi 2019 schedule : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे.

Pro Kabaddi 2019 : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाला हैदराबादमधून सुरुवात, जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार!
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
मागील हंगामात सर्वांचे लक्ष वेधणारा मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल. राहुल चौधरी हा तमीळ थलायव्हाज संघात अजय ठाकूरसोबत खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कॅप्टन कूल अनुप कुमार आणि राकेश कुमार यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील. हे अनुक्रमे पुणेरी पलटन व हरयाणा स्टीलर्स यांचा सामना करतील.
यंदाची लीग ही साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्यापूर्वी संघाला चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे.
हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलै
संपूर्ण वेळापत्रक
तारीख सामने वेळ
20 जुलै तेलुगू टायटन्स वि. यू मुंबा सायं. 7.30 वा.
बंगळुरू बुल्स वि. पाटणा पायरेट्स रात्री 8.30 वा.
21 जुलै बंगळुरु बुल्स वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स सायं. 7.30 वा.
तेलुगू टायटन्स वि. तमीळ थलायव्हाज रात्री 8.30 वा.
22 जुलै यू मुंबा वि. जयपूर पिंक पँथर्स सायं. 7.30 वा.
पुणेरी पलटन वि. हरयाणा स्टीलर्स रात्री 8.30 वा.
24 जुलै यूपी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स सायं. 7.30 वा.
तेलुगू टायटन्स वि. दबंग दिल्ली के.सी. रात्री 8.30 वा.
25 जुलै दबंग दिल्ली वि. तमीळ थलायव्हाज रात्री 8.30 वा.
26जुलै यूपी योद्धा वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स सायं. 7.30 वा.
तेलुगु टायटन्स वि. पाटणा पायरेट्स रात्री 8.30 वा.