शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकपदासाठी शास्त्री, अरुण, बांगर यांची अर्ज करण्याची तयारी

By admin | Updated: June 1, 2016 03:29 IST

भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह त्यांचे सपोर्ट स्टाफचे सहकारी आगामी काही दिवसांमध्ये बीसीसीआयच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत

नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यासह त्यांचे सपोर्ट स्टाफचे सहकारी संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर आगामी काही दिवसांमध्ये बीसीसीआयच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत. शास्त्रीसह फलंदाजी प्रशिक्षक बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आगामी काही दिवसांमध्ये आपले अर्ज सादर करतील, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नाव उघड न करण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने सांगितले, की सर्व तिन्ही प्रशिक्षक (अरुण, बांगर, श्रीधर)शास्त्री यांच्यासह अर्ज सादर करणार आहेत. कारण त्यांना बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. अर्ज सादर करावा लागणार असल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. ते जाहिरातीची प्रतीक्षा करीत आहेत. बीसीसीआयच्या सूत्राच्या मते अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षपदी निवड होण्याच्या काही दिवसांपूर्वी सपोर्ट स्टाफने दिल्लीमध्ये त्यांची भेट घेतली होती. ठाकूर यांनी सपोर्ट स्टाफच्या कार्याची प्रशंसा केली होती. सूत्रानी सांगितले, की बीसीसीआयच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले, की योग्य व पात्र व्यक्तीला अर्ज करता येईल.