शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीनंतर दिले युक्तीच्या वापराला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:44 IST

वर्ल्ड चॅम्पियन सुपरमॉम : एम. सी. मेरीकोमचा स्वप्नवत प्रवास

नवी दिल्ली : सर्वप्रथम कौशल्य नसताना केवळ ताकदीच्या भरवशावर विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या एम. सी. मेरीकोमने एकही पंच न गमावता विजय मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या टप्प्यावर पोहचली असल्याचे म्हटले आहे.

तीन अपत्यांची आई ३६ वर्षीय मेरीकोमने शनिवारी सहावे विश्वविजेतेपद पटकावले. विश्व चॅम्पियनशिपमध्ये हे तिचे सातवे पदक आहे. विशेष म्हणजे स्पर्धेच्या दहा वर्षांच्या इतिहासात ती सर्वांत यशस्वी बॉक्सर ठरली आहे.

मणिपूरची ही बॉक्सर म्हणाली,‘२००१ ते आतापर्यंतच्या विश्व चॅम्पियनशिपच्या प्रवासाची आठवण ताजी आहे. अमेरिकेमध्ये १७ वर्षांपूर्वी रौप्यपदकासह सुरुवात करणाºया मेरीकोमने गेल्या आठवड्यात स्थानिक प्रेक्षकांच्या साक्षीने सहावे सुवर्णपदक पटकावले.मेरकोम म्हणाली, ‘२००१ मध्ये मी युवा व अनुभवहीन होती. माझ्याकडे कुठले कौशल्य नव्हते. केवळ ताकदीवर अवलंबून होती. पण, २०१८ मध्ये माझ्याकडे एवढा अनुभव आहे की, मी स्वत:वर दडपण येऊ दिले नाही. मी आता पंच खाण्यास इच्छुक नाही. त्याविना लढत जिंकण्याला प्राधान्य असते. यावेळी मी त्याच रणनीतीने यशस्वी ठरली. मी आता विचारपूर्वक खेळते.’

यापूर्वी २००६ मध्ये मेरीकोमने दिल्लीमध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते, पण त्यावेळी तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले नव्हते. त्यावेळी तिच्या चेहºयावर आनंद ओसांडून वाहत होता, पण यावेळी तिरंगा उंचावताना आणि राष्ट्रगीत सुरू असताना तिच्या डोळ्यात अश्रू दिसले.मेरीकोम म्हणाली, ‘कदाचित हाईप व दबावामुळे हे घडले असावे. त्यावेळी महिला बॉक्सिंगला एवढी लोकप्रियता नव्हती. यावेळी प्रेक्षकांमध्ये माझ्या नावाचा जयघोष केला. अखेरच्या दिवशी मला अश्रू आवरता आले नाही.’

मेरीकोम पुढे म्हणाली, ‘माझ्या कारकीर्दीतील विशेष पदकांपैकी एक आहे. सर्वांत विशेष कुठले पदक आहे, हे मला सांगता येत नाही. कारण प्रत्येक पदकासाठी तेवढीच मेहनत घेतली आहे. यावेळी अपेक्षा अधिक असल्यामुळे हे सर्वांत कठीण पदकांपैकी एक होते. मी राष्ट्रकुल विजेती असल्याने या स्पर्धेत माझ्यावर दडपण होते.’आॅलिम्पिकमध्ये ५१ किलो वजन गटाचा समावेश असल्यामुळे आणि ४८ किलो वजनगट वगळण्यात आल्यानंतर मेरीकोम दोन्ही वजनगटात खेळत आहे. तिने सर्व विश्वविजेतेपद ४८ किलो वजनगटात आणि आॅलिम्पिक कांस्य ५१ किलो वजन गटात पटाकवले होते.वजनगट बदलणे सोपे नाहीटोकियो आॅलिम्पिकमध्ये तिला पुन्हा एकदा पात्रता स्पर्धेत ५१ किलो गटात खेळावे लागले. ती म्हणाली, ‘हे सोपे नाही. यासाठी अधिक परिश्रमाची गरज असते, पण मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.’आपल्या कामगिरीबाबत बोलताना मेरीकोम म्हणाली, ‘हे यश मिळवणारी पहिला महिला बॉक्सर ठरल्यामुळे आनंद झाला. प्रत्येकाचे स्वप्न असते आणि मी माझे स्वप्न साकार करण्यात यशस्वी ठरल्यामुळे खूश आहे.’