Prashant Bhabad : कब्बडी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 09:59 IST2021-04-25T09:50:18+5:302021-04-25T09:59:14+5:30

Kabaddi coach Prashant Bhabad passed away : गेल्या काही दिवसांपासून प्रशांत भाबड हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

Prashant Bhabad: Kabaddi coach Prashant Bhabad passed away | Prashant Bhabad : कब्बडी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

Prashant Bhabad : कब्बडी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

ठळक मुद्देप्रशांत भाबड हे नाशिक शिक्षक प्रसारक मंडळाच्या रुंगटा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते.

नाशिक : येथील कब्बडी खेळाडू आणि प्रशिक्षक प्रशांत भाबड (वय 50)यांचे रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. अखेरीस मध्यरात्री त्यांचे निधन झाले. (Kabaddi coach Prashant Bhabad passed away)

कबड्डीच्या अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्यानंतर ते सध्या नाशिक शिक्षक प्रसारक मंडळाच्या रुंगटा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. नाशिकमध्ये अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा संयोजनात त्यांचा सहभाग होता तसेच अनेक कबड्डी पटू त्यांनी घडवले होते. 

राज्याच्या किशोरवयीन कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम बघितले होते. रूनग हायस्कूल तसेच व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ , भावजय असा परिवार आहे.

Web Title: Prashant Bhabad: Kabaddi coach Prashant Bhabad passed away